चोपडा तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात कस्तुरबा विद्यालय प्रथम..! जिल्ह्यावर निवड…!

चोपडा तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात कस्तुरबा विद्यालय प्रथम..! जिल्ह्यावर निवड…!


महाराष्ट्र, 9न्यूज नेटवर्क चोपडा


शिक्षण विभाग ,पंचायत समिती चोपडा आयोजित तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला आहे.


दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी येथील
विवेकानंद विद्यालयात “क्वांटम युगाची सुरवात-संभाव्यता व आव्हाने” या विषयावर तालुक्यातील एकूण 16 शाळांनी सहभाग नोंदवला होता.या मेळाव्यात कस्तुरबा माध्यमिक
विद्यालयातील पायल नरेंद्र पाटील
(10 वी)हिने प्रथम क्रमांक मिळविला .सदर विद्यार्थ्यांनीची निवड जिल्हा स्तरावर झाली आहे.तिला मार्गदर्शन विज्ञान शिक्षक एन आर पाटील श्रीमती आर पी शाह यांनी केले.यावेळी गटशिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे, शिक्षण विस्तार अधिकारी अजित पाटील यांनी त्यांचा गौरव केला.


तर मेळाव्यात नक्षत्र बाळकृष्ण कापुरे (विवेकानंद विद्यालय, चोपडा ) याने द्वितीय क्रमांक , आयुष किरण पाटील (पंकज विद्यालय,चोपडा)तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ शिवराज अनिल पाटील (प्रताप विद्या मंदिर,चोपडा) यांनी पटकावला आहे.
परीक्षक म्हणून भूपेंद्र पाटील (हातेड), संजय पाटील(कोळंबा)व विजय पालीवाल (वडती) यांनी कामकाज पाहिले.


सदर कार्यक्रमास केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे व देवेंद्र पाटील, साधन व्यक्ती सुनील मेश्राम,प्रशांत सोनवणे, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, व्ही. आर पाटील, तालुका विज्ञान मंच अध्यक्ष भूपेंद्र पाटील , उपाध्यक्ष संजय पाटील, सह सचिव निलेश पाटील,सदस्य किशोर पाटील व श्रीमती एस. एम. चौधरी तालुक्यातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More