चोपडा शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार # पारंपरिक वाद्य व गुलालाची उधळण ठरले मुख्य आकर्षण

चोपडा शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार # पारंपरिक वाद्य व गुलालाची उधळण ठरले मुख्य आकर्षण

चोपडा शहरातील पाचव्या दिवशी होणारे गणेश विसर्जन हे जिल्ह्यातील मुख्य आकर्षण होत चालले आहे त्यात चोपड्यातील उंच मुर्त्या ,पारंपरिक वाद्य ,गुलालाची उधळण ह्या मुळे चोपड्यातील विसर्जन बघण्यासाठी जिल्यातील गणेश भक्त दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चोपड्यात येत असतात.


दि.३१ रोजी पहाटे ७ वाजेपासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली त्यात चोपडा शहरातील नोंदणीकृत ६२ सार्वजनिक गणेश मंडळा तर्फे मिरवणूक मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या साठी चोपडा शहर पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्वतः पोलिस अधीक्षक महेश्वररेड्डी ,अप्पर अध्यक्ष कविता नेरकर,उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप,स्थानिक गुन्हे शाखेत नुकतेच रुजू झालेले पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड,चोपडा शहर पोलिस निरीक्षक,मधुकर सावळे,चोपडा ग्रामीण पोलिस निरीक्षक महेश टाक हे ठाम मांडून होते .तसेच चोपडा येथील सर्व राजकीय पक्षाचा पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गात जागोजागी स्टॉल लावून गणेश भक्तांचे स्वागत करत त्यांना स्मृती चिन्ह देण्यात आले.


पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असलेल्या मिरवणुकीत गुलालाची रेकॉर्ड ब्रेक उधळण करण्यात आली पहाटे साडे पाच वाजेपासून चोपडा नगर परिषद तर्फे
मुख्याधिकारी राहुल पाटील यांचा मार्गदर्शन खाली स्वच्छता निरीक्षक जयेश भोंगे , व्हि. के पाटील व दीपाली साळुंखे सर्व मुकादम व ७० स्वच्छता कर्मचारी ४ ट्रॅक्टर १ जेसीबीच्या मदतीने शहरातील गांधी चौक , मेन रोड,आझाद चौक भागातून रस्त्यावर पडलेला गुलाल पहाटे पाच वाजेपासून गोळा करण्यास सुरुवात केली पहाटे १०ट्रॅक्टर गुलाल गोळा करण्यात आले होते अजून दहा ट्रॅक्टर गुलाल गोळा होईल असे स्वच्छता निरीक्षक जयेश भोंगे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More