भारत फायनान्स इंडसइंड बँक चोपडा शाखेत साडे अकरा लाखाचा अपहार तीन जणांवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
चोपडा येथील भारत फायनान्सशियल इन्कूलजन लिमीटेड शाखा चोपडा येथे फिल्ड असीस्टंट म्हणून कार्यरत असतांना त्याचे काम फिल्ड वर जावून कलेक्शनची रक्कम जमा करुन ती रक्कम कार्यालयात रोखपाल कडे जमा करणे असे असतांना यातील आरोपी १. कैलास भागचंद राठोड व २६ वर्ष गणेशनगर खडकी ता एरंडोल जि. जळगाव २ कल्पेश संतोष पाटील-वय-२५ वर्ष रा भालगाव ता एरंडोल जि. जळगाव ३. दिगंबर अभिमान खिल्लले वय.२८यांनी संगनमत करुन दिनांक ०६/०१/२०२३ ते दिनांक २३/०८/२०२४ या कालवधी मध्ये कंपनीचे कर्जदार सदस्यांकडून कलेक्शन हप्त्याची रक्कम कंपनी कार्यालयात रोखपाल मांचे कडे जमा न करता

आरोपी क्रमांक १. कैलास भागचंद राठोड वय.२६ वर्ष रा गणेशनगर खडको खुर्द ता. एरंडोल जि जळगाव याने २१ ग्राहकांची हप्त्याची रक्कम ०७,३४,३०४/- रु तसेच आरोपी क्रमांक २. कल्पेश संतोष पाटील वय-२५ वर्ष रा भालगाव ता एरंडोल जि जळगाव याने १४ ग्राहकांची हप्त्याची रक्कम ०२,७९,७३२/- रु तसेच आरोपी क्रमांक ३. दिगंबर अभिमान खिल्ले बय-२८ वर्ष रा अनफवाडी पोस्ट आर्षी ता जि धुळे याने सुध्दा १४ ग्राहकांची ०१,३८,५०३/- रु अशी ग्राहकांकडुन जमा एकूण ११५२५३९/-रुपयेहप्त्याची रक्कम बँकेच्या कार्यालयात न जमा करता संगनमत करुन स्वताः जवळ ठेवुन त्या रकमेधा आपल्या दैनंदीन जिवनात स्वताः फायद्यासाठी वापर करुन बैंकेची तसेच कर्जदार (ग्राहक) यांचा विश्वास संपादन करून विश्वासघात तसेच फसवणुक केल्या प्रकरणी

वासुदेव कैलास पाटील वय-२८ वर्ष चंदाच मेनेजर भारत फायनान्स इंडसइंड बैंक शनिमंदीर चौक पारोळा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४),३१६(२),३१६(५)३(५)प्रमाणे चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चोपडा पोलिस निरीक्षक मधुकर सावळे यांचा मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अनिल रघुनाथ भुसारे करत आहे .













