चोपडा नगर परिषदेचे उपनगराध्यक्षपदी पंकज सुरेश बोरोले यांची निवड # स्वीकृतसदस्य म्हणून शिवसेनेचे हनीफ सत्तार आणि दिपक पाटीलयांची निवड

चोपडा येथील नगरपरिषदेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आल्यानंतर आज उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया – पार पडली. या निवडीत शिवसेनेचे शिंदे गटाचे पंकज बोरोले यांची बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड

करण्यात आली.चोपडा नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मध्ये नगराध्यक्षा नम्रता पाटील, मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. यासभेत नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असून पंकज बोरोले यांचे एकमेव नामनिर्देशन वैध ठरल्याने त्यांची निवड घोषित करण्यात आली. दरम्यान, स्वीकृत सदस्य म्हणून शिवसेनेचे हनीफ सत्तार आणि दिपक पाटीलयांची निवड करण्यात आली.

तर विरोधी पक्षाकडून भाजपचे ज्येष्ठ नेते तिलकाचंद शहा यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली.निवड झालेल्या सर्व सदस्यांचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्यासह उपमुख्य अधिकारी संजय मिसार अधिकारी कर्मचारी यांच्याहस्ते रोप देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे नगरसेवक डॉ.रोहन पाटील यांनीही सत्ताधारी नगरसेवकांचे तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आपल्याला पाच वर्षे पूर्ण खेळीमुळेचे काढायचे आहे. पण चोपडा नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी ही नगरसेवकांच्या नागरिकांच्या समस्यांसाठी मान ठेवावा. असेही सांगितले व आम्हीही विरोधी पक्षात बसलो आहोत यांची भान ठेवा. आणि शहरात उपनगराध्यक्षासह स्वीकृत नगरसेवकांची विजय मिरवणूक काढण्यात आली आहे.

यावेळीछत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करित मिरवणूक आझाद चौक मल्हारपुरा,आनंद भवानी येथे समारोप करण्यात आला. यावेळी शिवसेनाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More