चोपडा महसूल हद्दीतून दुसऱ्या तालुक्यातील वाळू वाहतुकीस मनाई : नायब तहसीलदार केली हद्द निश्चिती

चोपडा तालुक्यातील तापी नदी पात्रातून वाळू वाहतूक करतांना ज्या त्या तालुक्याच्या हद्दीतून वाहतूक करण्यात यावी असे असताना अमळनेर तालुक्यातील वाळूचे ट्रॅक्टर चोपडा महसुलच्या हद्दीतून जात असल्याची माहिती प्राप्त होताच नायब तहसीलदार योगेश पाटील यांनी तापी नदी पात्रात जाऊन सर्व ट्रॅक्टर रोखून यांची हद्द निश्चिती केली. तसेच चोपडा महसुलच्या हद्दीतून वाळू वाहतूक झाल्यास कारवाई करण्यात येईल अशी समज ठेकदारांना दिली.

     ३० रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पात्रातील होणारी वाळू वाहतूक चोपडा महसूल हद्दीतून होत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने नदीपात्रात नायब तहसीलदार योगेश पाटील यांनी ग्राम अधिकाऱ्यांसह दाखल झाले. यावेळी अमळनेर महसूल हद्दीतील दापोडी, मुंगसे, नारखेडे व धावडे या ठिकाणच्या वाळू उपसा सुरू असून ते ट्रॅक्टरने चोपडा महसूल हद्दीतून येत असल्याने त्यांना थांबवून प्रत्यक्ष महसूल हद्द मोजून दिली. तसेच यापुढे चोपडा महसूल हद्दीतून वाळू वाहतूक केल्यास कारवाई करण्यात येईल अशी समज ठेकदारांना देण्यात आली

यावेळी नायब तहसीलदार दत्तात्रय सैंदाने, मंडलाधिकारी सुरेश पाटील, ग्राम अधिकारी तिलेश पवार, अमळनेर ग्राम अधिकारी प्रकाश महाजन हे उपस्थित होते.

नायब तहसीलदार योगेश पाटील चोपडा.

” भविष्यात गैरसमज होऊ नये तसेच अवैध गौणखानिज वाहतूक होऊ नये यासाठी हद्द निश्चिती केली.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More