बाहर केळी पिक विमा योजनेत सुमारे 23 कोटी 63 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात 9सीएस सी सेंटर चालकांविरुद्ध आणि आडावद पोलीस ठाण्यात 3 तर चोपडा ग्रामीण पोलिसात 1 अशे एकूण 13 CSC सेंटर चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षी चोपडा तालुक्यात विमा कंपनीतर्फे केळीसाठी अंबिया बाहर विमा योजना राबविण्यात आली होती. या योजनेत शेतकऱ्यांतर्फे सहभाग नोंदवला जातो. पिक विम्याचा अर्ज सीएससी सेंटर मार्फत पिक विमा कंपनीकडे सादर केला जातो. मात्र एमआरसाक प्रणालीने केलेल्या पडताळणीत चोपडा तालुक्यातील केळी पिक आढळून आलेले नाही. त्यामुळे या क्षेत्रावरील पिक विमा जास्तीचा आढळून आले आहे.अमोल भास्कर पाटील चोपडा,सुदर्शन वासुदेव पाटील चोपडा,नितीन भागवत माळी चोपडा,जितेंद्र गुरुदास शिंपी चोपडा घनशाम अशोक भोई चोपडा,पंकज नागेशराव सोनवणेचोपडा,मनोज मुरलीधर पाटील ,चोपडा,विनोद सुरेश जव्हागे चोपडा,अविनाश विष्णू पाटील
चुंचाळे या सीएससी सेंटर चालकांनी शासनाचा विश्वासघात करून फसवणूक केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध आज चोपडाचोपडा शहर पोलीस स्टेशन येथील हद्दीतील 9 सी एस सी सेंटर क्रेद चालक यांना दिनांक 01/10/2025 ते दिनांक 31/10/2025 पावेतो चोपडा शहरातील तसेच चुंचाळे गावातील CSC क्रेद्रात शेतक-याचे केळी पिक नसतांना पिकविमा यांचे बनावट कागदपत्र बनवुन ती खरी आहे असे मानुन तीचा वापर करुन राज्य शासनाचे 13 कोटी 44 लाख 62 हजार 724 रुपये व केंद्र शासनाची 10 कोटी 18 लाख 65 हजार 700 असे एकुण 23 कोटी 63 लाख 28 हजार 424 रुपये मात्र वरील रक्कमेची शासनाची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला म्हणुन भारतीय न्याय संहिता कलम 336,337,340,342 गुन्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून पिक विमा घोटाळ्यातील अनेक चेहरे पोलीस चौकशीतून समोर येणार आहे. पिक विम्याच्या घोटाळ्या गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पिक विम्यात अनेकांचे हात ओले
दरम्यान, क्षेत्रावर केळीची लागवड नसताना खोटे सातबारा उतारे जोडून सीएससी सेंटर चालकांनी पिक विमा काढल्याचे शासकीय तपासणी व पडताळणीत उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी योग्य दिशेने तपासचक्र फिरवल्यास चौकशीतून अनेकांचा चेहरा समोर येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी दिली.
ह्या सर्वांचा प्रकरणाचा मास्टर माईंड चोपडा तालुक्यातील कठोरा भागातील असल्याची चर्चा तालुक्यातून होत आहे पोलीस तपासात पोलीस तपासात मास्टरमाइंड समोर येणार का?याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.












