चोपड्यात 70 गोवंश पळवल्याचा आरोप, F I R ची मागणी; 12 गोवंश ताब्यात, दगडफेक झाली नाही अण्णासाहेब घोलप #रोहित निकम यांनी दिले निवेदन

चोपडा शहरातील के जि एन कॉलनी येथे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले ७० गोवंश पळवून नेल्याची तक्रार मानद प्राणी कल्याण अधिकारी आदित्य विजय माळी यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला केली आहे याप्रकरणी F I R दाखल करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस निरीक्षकांकडे अर्जाद्वारे केली आहे.

दिनांक १३ रोजी माळी यांनी म्हटले आहे की के जि एन कॉलनी येथे कत्तलीसाठी ७० गोवंश बांधलेले होते पोलीस प्रशासनाच्या समोरच काही लोकांनी ते गोवंश पळवून नेले यावेळी पोलीस प्रशासनावर व गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे

घटनेचा व्हिडीओ व जीपीएस प्रणालीसह फोटो पुरावा म्हणून आपल्याकडे उपलब्ध असल्याचे अर्जात नमूद केले आहे चोपड्यात यापूर्वीही अशा घटना घडल्या असून वारंवार तक्रार करूनही योग्य दाखल घेतली जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे गोवंश पळवणाऱ्यांवर व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे पळवून नेलेले गोवंश कायदेशीररित्या गोशाळेत जमा करावेत

या घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रोहित दादा निकम यांनी चोपडा तालुक्यातील गावठी गायींचे बळजबरीने उ‌द्ध्वस्तीकरण व गोरक्षकांवर हल्ले होत आहेत. गोरक्षकांना धमकी दिली जाते व त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. हे गौहत्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन असून, महाराष्ट्र शासनाने देशी गायींना “राज्यमाता-गौमाता” दर्जा दिल्याने हे अधिक गंभीर आहे.गायींचे उद्ध्वस्तीकरण थांबवा व गोरक्षकांवरील गुन्हे रद्द करा,गौहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करा,गोरक्षकांना धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा व गौशाळा संरक्षण द्या.मागण्या मान्य न झाल्यास शांततापूर्ण आंदोलन छेडण्यात येईल. तात्काळ कारवाईची विनंती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांना निवेदन दिले यावेळी गजेंद्र जयस्वाल, अनिल वानखेडे, संग्राम परदेशीं,प्रवीण जैन शरद पाटील, हरीश माळी, प्रेम घोगरे, विशाल भावसार, मनोहर बडगुजर, कमलेश सोनवणे यांच्यासह असंख्य गोरक्षक टिया मांडून पोलीस स्टेशन येथे होते व हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते

याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आतापर्यंत 12 गोवंश ताब्यात घेण्यात आले आहेत तसेच कुठल्याही प्रकारे गोरक्षकांवर दगडफेक झाली नसल्याचे सांगत त्यांनी हल्ल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More