चोपडा नगर परिषदेत भाजप नगरसेवकाचे समर्थकांसह ठिय्या आंदोलन; अभियंत्यांच्या अनुपस्थितीवर संताप, कारवाईची मागणी

चोपडा नगर परिषदेत भाजप नगरसेवकाचे समर्थकांसह ठिय्या आंदोलन; अभियंत्यांच्या अनुपस्थितीवर संताप, कारवाईची मागणी

महाराष्ट्र9न्युज नेटवर्क ​चोपडा:

“नगर परिषदेतील बांधकाम, पाणीपुरवठा आणि इतर विभागातील अभियंते विरोधी गटाच्या लोकप्रतिनिधींच्या कामांना प्राधान्य देत नाहीत. आमच्या सूचनांना थेट केराची टोपली दाखवली जात असून, आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे,” अशी तीव्र नाराजी व्यक्त करत भाजप नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी आपल्या समर्थकांसह नगर परिषद इमारतीतील पाणीपुरवठा आणि स्वच्छता कार्यालयाबाहेरील दालनात थेट ठिय्या आंदोलन केले. काल (दि. १९) सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला.

​अधिकाऱ्यांची दांडी; ‘थम’ लावून पळ काढत असल्याचा आरोप…

​मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्र. ९ मधील समस्या मांडण्यासाठी नगरसेवक नरेंद्र पाटील हे काल सकाळी ११ वाजता आपल्या समर्थकांसह नगर परिषद कार्यालयात पोहोचले. मात्र, यावेळी बांधकाम अभियंता, पाणीपुरवठा अभियंता यांच्यासह अनेक जबाबदार अधिकारी आपल्या जागेवर गैरहजर होते. “अधिकारी वेळेवर कार्यालयात न येता कर्मचाऱ्यांना ‘थम’ (बायोमॅट्रिक हजेरी) लावायला सांगून कधीही येतात. अधिकारीच हजर नसतील तर आम्ही आमची कैफियत मांडायची कोणाकडे?” असा संतप्त सवाल करत नरेंद्र पाटील यांनी कार्यकर्त्यांसह कार्यालयाच्या दालनातच ठिय्या मांडला.

​५ दिवसांपासून हजारो लिटर पाण्याची नासाडीया आंदोलनादरम्यान उपमुख्याधिकारी संजय मिसर यांना एक निवेदन देण्यात आले.

प्रभाग क्र. ९ मधील गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे..

प्रभाग क्रमांक 9 चे नगर सेवक नरेंद्र पाटील हे त्याचा प्रभागात मागील पाच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली आहे.यामुळे तासाला हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.​सध्या सर्वदूर पाऊस नसल्याने भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.आधीच चोपडा शहरात तब्बल आठ दिवसांआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.अशा गंभीर परिस्थितीत पाणी वाया जात असल्याची तक्रार पाणीपुरवठा अभियंता जितेंद्र मोरे यांच्याकडे अनेकदा प्रत्यक्ष तसेच भ्रमणध्वनीवरून करण्यात आली. मात्र, त्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

या’ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

​ठिय्या आंदोलनादरम्यान नगर परिषदेतील इतर विभागांची पाहणी केली असता, अनेक अधिकारी वरिष्ठांना कुठलीही पूर्वसूचना न देता गैरहजर असल्याचे आढळून आले. यात:
१. जितेंद्र मोरे (पाणीपुरवठा अभियंता)
२. दिगंबर वाघ (बांधकाम अभियंता)
३. संजय ढमाळ
४. सचिन देसले
५. महेश जोशी
​कर्तव्यात आणि कामात असा निष्काळजीपणा दाखवणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

​नागरिकांची मोठी उपस्थिती

​या ठिय्या आंदोलनाप्रसंगी नगरसेवक डॉ. रोहन पाटील, रणजीत देशमुख यांच्यासह शहरातील नागरिक दिनेश पवार, प्रेम घोगरे, सुनील सोनगिरे, मितेश भावसार, अशोक शिंपी, सचिन बिरारी, अरुणा पाटील, देवा पारधी, राजेश खैरनार, श्याम भंडारकर, देवदत्त वैद्य यांच्यासह मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे चोपडा शहरात सध्या तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More