अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानमध्ये भीषण आग प्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला तातडीच्या मदतीचे आदेश.

अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानमध्ये भीषण आग प्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला तातडीच्या मदतीचे आदेश..

महाराष्ट्र9न्युज नेटवर्क अंमळनेर 

​अमळनेर: अमळनेर येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानमध्ये नुकतीच भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत संस्थानचे मोठे नुकसान झाले असून, परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

​आज या दुर्घटनास्थळाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली या भेटीदरम्यान परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा व तालुका प्रशासनाला युद्धपातळीवर अत्यावश्यक उपाययोजना करण्याबाबत कडक निर्देश देण्यात आले आहेत.

​पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर हालचाली

​संस्थानच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.​पुढील आवश्यक ती मदत आणि पुनर्वसनाची कामे वेगाने पूर्ण केली जाणार आहेत.संत सखाराम महाराज वाडी हे सर्वांचेच श्रद्धास्थान असल्याने, या वैभवशाली वारशाचा गौरव पुन्हा पूर्ववत होईल, असा विश्वास याप्रसंगी गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More