चोपडा तालुक्यातील हातेड येथे ज्या शाळेत पहिलीत घातले पाऊल, ५० वर्षांनंतर त्याच शाळेतून निवृत्त!# ​मुख्याध्यापक पुरुषोत्तम सोनवणे यांनी निवृत्तीप्रसंगी शेवटचा १ लाख ३७ हजारांचा पूर्ण पगार दिला शाळेला भेट

चोपडा तालुक्यातील हातेड येथे ज्या शाळेत पहिलीत घातले पाऊल, ५० वर्षांनंतर त्याच शाळेतून निवृत्त!# ​मुख्याध्यापक पुरुषोत्तम सोनवणे यांनी निवृत्तीप्रसंगी शेवटचा १ लाख ३७ हजारांचा पूर्ण पगार दिला शाळेला भेट

महाराष्ट्र9​न्युज नेटवर्क हातेड (तालुका चोपडा)

चोपडा तालुक्यातील हातेड येथे ‘ज्या शाळेत ५० वर्षांपूर्वी पहिलीच्या वर्गात श्रीगणेशा केला, त्याच शाळेत आयुष्याच्या शेवटी मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावून निवृत्त होण्याचा योग येणे’ ही अत्यंत दुर्मिळ आणि भावूक बाब जिल्हा परिषद केंद्र शाळा हातेड येथील निवृत्त मुख्याध्यापक श्री. पुरुषोत्तम विठ्ठलराव सोनवणे यांच्या बाबतीत घडून आली आहे. ३५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्ठामय सेवेनंतर ३१ मे २०२६ रोजी ते सेवानिवृत्त झाले. या प्रसंगी त्यांनी आपल्या शेवटच्या महिन्याचा १,३७,००० रुपयांचा पूर्ण पगार शाळेच्या विकासासाठी सप्रेम भेट देऊन एका नव्या आदर्शाची निर्मिती केली आहे.

५० वर्षांचा अनोखा शैक्षणिक प्रवास

​श्री. पुरुषोत्तम सोनवणे (रा. हातेड खुर्द) यांनी सन १९७४ मध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळा हातेड येथे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतला होता. शिक्षण आणि त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील ३५ वर्षांच्या यशस्वी सेवेनंतर, नशिबाच्या योगाने शेवटी सेवापूर्तीची शेवटची दोन वर्षे त्यांना याच स्वतःच्या बालपणीच्या शाळेत ‘ग्रेडेड मुख्याध्यापक’ म्हणून सेवेची संधी मिळाली. आपल्या मातृसंस्थेतूनच आणि स्वतःच्या जन्मभूमीत सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याचा उराशी बाळगलेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

सामाजिक बांधिलकी आणि दानशूरता

​सेवानिवृत्तीच्या अंतिम दिवशी शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने श्री. सोनवणे गुरुजी व त्यांच्या धर्मपत्नीचा भावूक वातावरणात सहपत्नी सत्कार करण्यात आला. या निरोप समारंभाच्या वेळी गुरुजींनी आपला १ लाख ३७ हजार रुपयांचा शेवटचा पगार शाळेला सुपूर्द केला.

​”या निधीचा उपयोग गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांची परीक्षा फी भरण्यासाठी, शैक्षणिक सहल, शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी तसेच शाळेच्या भौतिक सुविधा व गरजा भागवण्यासाठी केला जावा,” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

​’शाळेसाठी सदैव तत्पर राहीन’

​याप्रसंगी बोलताना श्री. सोनवणे गुरुजी म्हणाले, “ज्या शाळेने मला घडवले, त्याच शाळेत ३५ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होताना मन अत्यंत प्रसन्न आणि आनंदी आहे. भविष्यातही शाळेला काही अडचण आल्यास किंवा मदतीची गरज भासल्यास मी सदैव तत्पर राहीन.”

​शाळेतील शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या या अनोख्या उपक्रमाचे आणि दातृत्वाचे मनःपूर्वक कौतुक केले असून त्यांच्या भावी आयुष्यासाठी उत्तम आरोग्याच्या आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More