चोपडा नगर परिषदेत साडेचार लाखांचा कथित अपहार; चौकशी सुरू, दोषींवर कठोर कारवाईचा नगराध्यक्षांचा इशारा

चोपडा नगर परिषदेत साडेचार लाखांचा कथित अपहार; चौकशी सुरू, दोषींवर कठोर कारवाईचा नगराध्यक्षांचा इशारा

महाराष्ट्र9न्युज नेटवर्क ​चोपडा (विशेष प्रतिनिधी)

चोपडा नगर परिषदेत सुमारे साडेचार लाख रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आल्याने पालिका वर्तुळात आणि शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या अनियमिततेप्रकरणी मुख्याधिकारी धांडे यांनी संबंधितांना नोटीस बजावली असून, चौकशीत जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर नियमानुसार कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नगराध्यक्ष नम्रता पाटील यांनी दिला आहे.

​जन्म-मृत्यू नोंद विभागाशी संबंधित प्रकार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कथित अपहार नगर परिषदेच्या जन्म-मृत्यू नोंद विभागाशी संबंधित असल्याची जोरदार चर्चा आहे. या गैरव्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. वेळेत माहिती समोर आली नसती तर हा विषय दडपण्याचा प्रयत्न झाला असता, असा संशयही नागरिक व्यक्त करत आहेत;

​प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह?

नगर परिषदेत तब्बल तीन अकाउंटंट कार्यरत असतानाही असा प्रकार घडल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वेळेवर बदल्या होत नसल्याने प्रशासनात शिथिलता आल्याचा आरोप केला जात आहे. एकाच ठिकाणी दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने पारदर्शकता संपत असून, नियमित बदली प्रक्रिया राबवण्याची मागणी जोर धरत आहे.

​प्रशासकीय प्रतिक्रिया:

​नगराध्यक्ष नम्रता पाटील:कथित अपहार या विषयी महाराष्ट्र9ने नगरअध्यक्षा नम्रता पाटील यांना विचारणा केली असता काही दिवसा पूर्वी हे प्रकरण लक्षात आले असता मी सदर प्रकरण संधर्भात मुख्याधिकारी यांचाशी चर्चा केली आणि जन्म मृत्यू नोंदी विभागाचा अधिकारी व कर्मचारी यांना खुलासा सादर करण्या संदर्भात नोटीस देण्यात आली आहे.दोषींवर कठोर कारवाई निश्चित केली जाईल.असल्याचे सांगितले

मुख्याधिकारी विवेक धांडे यांची प्रतिक्रिया:

​त्रुटी निदर्शनास: इंटरनल ऑडिटर (अंतर्गत लेखापरीक्षक) यांनी रक्कम भरताना काही त्रुटी झाल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.​नोटीस बजावली: याप्रकरणी जन्म-मृत्यू विभागाचे लिपिक, संबंधित कर्मचारी आणि विभागप्रमुख यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे.​रक्कम: प्राथमिकदृष्ट्या ४ लाख किंवा त्याहून काही अधिक रुपयांची अनियमितता दिसून येत आहे.

कठोर कारवाईचा इशारा: चौकशी पूर्ण झाल्यानंतर आणि खुलासा प्राप्त झाल्यानंतर जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक (Strict) कारवाई केली जाईल.​कर्मचाऱ्यांची नावे: सध्या जन्म-मृत्यू विभागाचे विभाग प्रमुख संजय गोपाल मीसर,अर्जुन मरदणि,दिनेश महाजन,जयंत सातवे कर्मचारी आणि विभागप्रमुख चौकशीच्या कक्षेत असून अधिकृत नावे चौकशी अंती स्पष्ट होतील सध्या या प्रकरणाचा अधिकृत चौकशी अहवाल येणे बाकी असून, दोषींवर निलंबनासह कोणती प्रशासकीय कारवाई होते, याकडे संपूर्ण चोपडा शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More