धुळ्यात सूर्योदय व विश्वमानव विकास फाउंडेशनतर्फे ४०० हून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप

धुळ्यात सूर्योदय व विश्वमानव विकास फाउंडेशनतर्फे ४०० हून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप

महाराष्ट्र9न्युज नेटवर्क ​धुळे:

सूर्योदय फाउंडेशन (प्रयागराज) आणि विश्वमानव विकास फाउंडेशन (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ऑगस्ट २०२६ रोजी धुळे शहरातील हिरे भवन येथे भव्य महिला सक्षमीकरण व मोफत शिलाई मशीन वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ४०० पेक्षा जास्त पात्र व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

​सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे महाराष्ट्र विधानसभा सदस्य अनुप अग्रवाल आणि धुळ्याच्या महापौर सौ. मायादेवी परदेशी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून धुळे महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. कल्याणी सतीश अंपलकर, धुळे भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र महादेव अंपलकर, भाजप युवा मोर्चा धुळे महानगर अध्यक्ष आकाश परदेशी, धुळे महानगर कोषाध्यक्ष अजय अग्रवाल तसेच भाजप नगरसेवक ओमप्रकाश खंडेलवाल उपस्थित होते.

​आयोजक संस्थांच्या वतीने सूर्योदय फाउंडेशनचे सचिव वीरेंद्र कुमार राय, उपाध्यक्ष घनश्याम द्विवेदी, विश्वमानव विकास फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज वसंत बडगे, उपाध्यक्ष सौ. सीमा धनराज बडगे, मीडिया प्रभारी विनोद पांडुरंग चौधरी आणि महिला संघटक सौ. माधुरी विनोद चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

​सूर्योदय फाउंडेशन व विश्वमानव विकास फाउंडेशनच्या अध्यक्षांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवला जात असून भविष्यातही तो निरंतर सुरू राहील. जास्तीत जास्त पात्र व गरजू महिलांनी या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

​कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांसाठी व लाभार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी आणि उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. हक्काच्या रोजगाराचे साधन मिळाल्यामुळे सर्व लाभार्थी महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसत होते. उपक्रमाबद्दल सर्व लाभार्थ्यांनी सूर्योदय फाउंडेशन व विश्वमानव विकास फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More