चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे कोरोना बाधित मुस्लिम तरुणाने डॉक्टरांसह संपूर्ण स्टाफ चे मानले आभार
चोपडा प्रतिनिधी सचिन जायसवाल
चोपडा तालुक्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे कोरोना बधीतांची संख्या ही 423 पर्यंत पोहचली आहे तरी पण चोपडा उपजिल्हा रुग्णालय हे कोरोना बाधितांची एका परीवारा सारखी सेवा देत आहे डॉक्टर त्यांचे कर्तव्य बजावत आहे त्याचा सोबतीला असलेला स्टाफ नर्स,वार्ड बॉय,सफाई कर्मचारी हे सर्व जण अगदी प्रामाणिकपणे सेवा देत आहे एखाद्या खाजगी रुग्णालयात सुधा अशी सेवा मिळणार नाही,किव्हा कोणत्या जिल्हा रुग्णालयात पण अशी सेवा मिळणार नसल्याचं बोलून दाखवलं संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्तम सेवा देत असल्याची प्रतिक्रिया दिली आज पर्यंत मला शासकीय रुग्णालय बाबद असलेला गैरसमज दूर झाला. मी चूनार अळी भागात राहतो माझा रिपोर्ट दी.12 रोजी पॉझिटिव आला होता असे जड अंतःकरणाने फोन वर महाराष्ट्र9शी बोलताना उपजिल्हा रुग्णालयाचे संपूर्ण स्टाफ हा कर्तव्य म्हणून सेवा बजावत आहे असे सांगून आभार मानले बोलताना त्या तरुणाचे अश्रू अनावर झाले .












