डिजिटल युगातही हळदीकुंकवाचे महत्व कायम

डिजिटल युगातही हळदीकुंकवाचे महत्व कायम
चोपडा प्रतिनिधी –
पारंपरिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी अजूनही स्त्रियांनी अनेक पारंपारिक सणाचे महत्व कायम ठेवले आहे . स्त्रियांच्या सर्वात आवडता सण म्हणजे हळदी कुंकू कार्यक्रम आणि वानांची लूट. काळानुरूप वाणांच्या वस्तू बदलल्या असल्या तरी अजूनही हळदीकुंकवाचे महत्त्व जसेच्या तसे कायम आहे .


चोपडा येथील बोराले नगर मधील एकता ग्रुपच्या महिलांनी एकत्र येऊन हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . दरवर्षी महिलांना वाण म्हणून विविध प्रकारच्या वस्तूंचे वाटप करण्यात येते पण यावर्षी संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असल्याने कोरोनाच्या नियमांच्या अधीन राहून कार्यक्रम घेण्यात आला व उपस्थित महिलांना सॅनिटायझर व मास्क वाण म्हणून देण्यात आले .


सदर कार्यक्रमात महिलांनी भक्तीगीते, भजन , नृत्य , गौळण व कपल डान्स आयोजन करून कार्यक्रमाच्या मनमुराद आनंद घेतला . कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकता ग्रुपच्या योगिता कोळी, मनीषा विसावे , लीलाताई पाकळे , मंगला चौधरी , नेत्रा पाटील, रुबीना तडवी आदींनी परिश्रम घेतले….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More