चोपडा शहर आदर्श करण्यासाठी प्रयत्न करणार
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील
चोपडा प्रतिनिधी —-
येथील नगरपरिषदेने बांधलेल्या भव्य सामाजिक सभागृहाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .चोपडा नगरपालिकेने जिल्ह्यात कुठेही नाही असा हॉल उपलब्ध करून दिला आहे , चोपडा नगरपालिकेने विविध योजनांच्या माध्यमातून भरपूर विकास कामे केली आहेत ,अजून काही कामे प्रगतीपथावर आहेत . चोपडा शहराला आदर्श शहर – नगर करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले .

मागचे सरकार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे होते पण त्या सरकारमध्ये शिवसेनेला फारसे महत्त्व नव्हतेच . अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरण मागील पाच वर्षापासून स्तब्ध आहे , कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला नाही .सदर प्रकल्पाला गती देण्यासाठी पावले टाकायचे ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले .
सदर कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्रा अरुणभाई गुजराथी (माजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ) , डॉ उल्हास पाटील (माजी खासदार ) , एड रवींद्र भैय्या पाटील , लताताई सोनवणे (आमदार चोपडा विधानसभा ) ,हाजी गफ्फार भाई (अल्पसंख्यांक सेल राष्ट्रवादी ) , घनश्याम अग्रवाल ,मनीषा जीवन चौधरी ( नगराध्यक्षा न पा चोपडा) , जीवन ओंकार चौधरी ( गटनेता ) भूपेंद्र गुजराती ( उपनगराध्यक्ष) , रमेश शिंदे ( सभापती बांधकाम ) ,अविनाश गांगोडे (मुख्याधिकारी) , हितेंद्र देशमुख (माजी उपनगराध्यक्ष ) इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी आपल्या प्रास्ताविकात नगरपालिकेने केलेल्या चार वर्षाच्या कामांचा आढावा सादर केला . विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा अरुणभाई गुजराथी आपल्या मनोगतात म्हणाले की ३५ वर्षापूर्वी मी चोपडा नगरपालिकेचा नगराध्यक्ष होतो तेव्हा नगरपालिकेत फक्त सहा लाकडी खुर्च्या , लाकडी टेबल व काही गाद्या होत्या , त्याकाळी नगरपालिकेत सायकलवर जायचो त्यांनी चोपडा साखर कारखाना सुरु करण्यासाठी जयंत पाटील यांना साकडे घातले तसेच रावेर यावल चोपडा तालुक्यांसाठी मेगा रिचार्ज प्रकल्प सुरू व्हावा तसेच अप्पर गूळ प्रकल्प , अनेर धरण ,पूर कालवा , हंड्या कुंड्या कालवा इत्यादी कालव्यांसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले . जयंत पाटील यांनी चोपडा शहर दत्तक घ्यावे असे त्यांनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या.

************************************
गुलाबराव पाटील व रक्षा खडसे यांची अनुपस्थिती
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व खासदार रक्षाताई खडसे यांनी सदर कार्यक्रमाला पाठ फिरवल्याचे दिसून आले .गुलाबराव पाटील हे अलिबाग याठिकाणी केले असल्याचे सांगण्यात आले तर खासदार रक्षा खडसे आल्या नाही पण त्यांनी शुभेच्छा पाठवल्या असल्याचे म्हटले .
************************************
प्रा अरुणभाई गुजराथी यांनी विकासावर फटकेबाजी करताना सांगितले की नगरपालिका सगळ्यांना सोबत घेऊन काम करीत आहे पण कुठेही बॅनरबाजी दिसून आलेली नाही मात्र आपल्या आमदार मात्र प्रत्येक कामाचे मोठे मोठे होर्डिंग्ज आणि बॅनर लावतात असा टोला लगावला त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला….
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी केले तर आभार जीवन चौधरी यांनी मानले …












