चोपडा नगरपालिका विकासकामांच्या भूमिपूजन समारंभ कार्यक्रमास दिलीप वळसे-पाटील यांची अनुपस्थिती
भूमिपूजन सोहळा साध्या पद्धतीने साजरा
चोपडा प्रतिनिधी :——–
येथील नगरपालिका विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभ राज्याचे कामगार व उत्पादनशुल्क विभाग मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते पूर्वनियोजित होता पण कोरोनाची वाढती संख्या व सार्वजनिक कार्यक्रमांवर असलेल्या बंदीचा विचार करता दिलीप वळसे पाटील यांचा चोपडा दौरा रद्द झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

त्यांच्या शुभहस्ते वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून महात्मा गांधी उद्यान सुशोभीकरण व विकसित करणे , विशेष रस्ता अनुदान योजनेतून कस्तुरबा हायस्कूल ते हरेश्वर पुलापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे व डिव्हायडर करणे , तसेच हरेश्वर पुलापासून ते शिरपूर बायपास पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे इत्यादी कामांच्या भूमिपूजन समारंभ नियोजित होता…
विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा अरुण भाई गुजराथी यांनी उपस्थितांना कोरोनाची व कोरोनाच्या नवीन नियमांची आठवण करून दिली ,राज्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर आज सोमवार पासून काही दिवस बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले व नियोजित उदघाटनाचा कार्यक्रम कोणत्याही प्रकारचा वाजागाजा न करता अगदी साध्या पद्धतीने व मोजक्याच उपस्थितांमध्ये सामाजिक अंतर राखून व कोरोनाचे नियमांचे पालन करून घेण्याचे सुचविले .

प्रा अरुणभाई गुजराथी यांच्या सूचनेनुसार नगरपालिका विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभ अगदी साध्या पद्धतीने घेण्यात आला , महात्मा गांधी उद्यान सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे विरोधी गटनेते भैय्या पवार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच रस्ता डांबरीकरण व डिव्हायडर कामाचे भूमिपूजन लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा जीवन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी घनश्याम अग्रवाल , एड संदीप भैय्या पाटील ,चंद्रहास गुजराथी , प्रा दिलीपराव सोनवणे ,नगराध्यक्षा मनिषा जीवन चौधरी ,उपनगराध्यक्ष भूपेंद्रभाई गुजराथी , गटनेते जीवन चौधरी , माजी उपनगराध्यक्ष राजू देशमुख , बांधकाम सभापती रमेश शिंदे ,एम डब्ल्यू पाटील , असगरअली सय्यद ,नगरसेविका दिपाली चौधरी, नगरसेविका कृष्णा पवार ,नगरसेविका सुप्रिया सनेर ,नगरसेवक अशोक बाविस्कर ,नगरसेवक राजाराम पाटील , विरोधी पक्ष गटनेता भैय्या पवार ,नगरसेवक राजेंद्र जयस्वाल ,के डी चौधरी ,देवा पारधी ,महेंद्र धनगर, नगरसेवक कैलास सोनवणे , नगरसेविका सेवाबाई देशमुख, चेतन चौधरी, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे व इंजिनियर सचिन गवांदे यांसह नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते…..













