आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बाप व भावाने केला गरोदर मुलीवर हल्ला, हल्ल्यात मुलगी व जावई गंभीर जखमी

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बाप व भावाने केला गरोदर मुलीवर हल्ला, हल्ल्यात मुलगी व जावई गंभीर जखमी

प्रतिनिधी |चोपडा
तालुक्यातील वर्डी येथील रहिवासी असलेल्या
मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा रागातून मुलीचे वडील व भावाने गरोदर असलेल्या मुलगी जया ठाकरे व जावई दिनेश ठाकरे(२३)याच्यावर विळ्याने व हतोडीने प्राणघातक हल्ला करून दोघाना गंभिर केल्याची घटना दि १८ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास वर्डी येथे घडली. या घटनेमुळे वर्डी गावात एकच खळबळ उडाली आहे.


तालुक्यातील वर्डी येथील दिनेश अरुण ठाकरे व जया दिनेश ठाकरे या दोघांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आंतरजातीय विवाह केला होता.विवाह नंतर दोघे जवळपास वर्षभर बाहेर गावी राहत होते
.पंरतु एक महिन्यापासून वर्डी गावात घरी राहायला लागले होते.
एक वर्षपुर्वी मुलीने आंतरजातीय विवाह केला या रागा पोटी मुलीचे वडील संतोष देवराम पाटील व भाऊ व सुनील संतोष पाटील या दोघानी जावई दिनेश ठाकरे यांच्यावर गावाबाहेर एकट्याला गाठून विळ्याने डाव्या हातावर व पाठीवर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यानंतर दिनेश च्या घरी जाऊन दिनेश ची पत्नी म्हणजेच पोटची मुलगी जयावर देखील वडील व भावाने विळा व हातोडीने डोक्याला व हाताला गँभिर दुखापत केली आहे.यात जयाच्या
हाताचे बोटे कापले गेली आहेत.जया ठाकरे ही गरोदर असल्याने तिची प्रकृती जास्तच गंभीर असल्याचे दिसून आले आहे.


घटनेनंतर नातेवाईकांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले त्याच्यावर डॉ पंकज पाटील,डॉ नरेंद्र पाटील यांनी उपचार केले,परंतु दोघेही गँभिर असल्याने त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More