यश-निवड
डी टी एड द्वितीय वर्षात चोपडा केंद्रातून
प्रणाली मोरे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण
चोपडा प्रतिनिधी :—–
येथील कु .प्रणाली रोहिदास मोरे हिने चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण शास्त्र विदयालयात डी टी एड व्दितीय वर्षात 81 .50 टक्के गुण मिळवून चोपडा केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे .

प्रथम वर्षालाही तिने प्रथम क्रमांक मिळविला होता . तिला चोपडा शिक्षण शास्त्र विद्यालयाचे प्राचार्य गोकुळ शिंदे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले असून
प्रणाली मोरे हिचे महात्मा गांधी शिक्षण मंडळ या संस्थेचे अध्यक्ष ऍड संदीप सुरेश पाटील व सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांनी अभिनंदन केले आहे .
कु. प्रणाली मोरे ही अडावद येथील दै. सकाळचे बातमीदार , चोपडा माध्यमिक पतपेढीचे संचालक व सार्वजनिक विद्यालयाचे शिक्षक आर टी मोरे यांची सुकन्या आहे .
तिच्या या यशाबद्दल चोपडा , अडावद आणि परिसरातील शिक्षक , नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे …












