पंकज विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी

पंकज विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी चोपडा प्रतिनिधी :—–
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती चोपडा येथील पंकज प्राथमिक विद्यालयात अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली .


विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केलेत. त्यावेळी बाबासाहेबांचे विचार विशद करताना ते म्हणाले की , उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे जयंती साधेपणाने साजरी होत आहे परंतु बाबासाहेबांचे कार्य आणि विचार सर्वांसाठी नेहमी प्रेरणादायी आहे.
शिक्षणासाठी , समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे , शिका संघटित व्हा असा गुरूमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजविणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 एप्रिल 1891 रोजी जन्म झाल्याचे त्यांनी नमूद केले .


बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी, चैत्यभूमी इतर संबंधित स्थळे ,सार्वजनिक ठिकाणे ,शहरे – गावे ,शाळा- महाविद्यालय , विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात पण यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने घरातूनच त्यांना अभिवादन करणे योग्य राहील .
कार्यक्रम प्रसंगी सी एस जाधव , एस सी पाटील, डी एम जयस्वाल , आर डी पाटील , दिलीप बाविस्कर इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More