ठगास ठग …महा ठग…
मूर्खपणा चाललाय …
चोपडा प्रतिनिधी :—–
ठगांबाबत बारकाईने अभ्यासल्यावर सिनेमातून दाखविण्यात आलेलं चित्रीकरण खोटं वाटू लागतं . कोणत्या ठगाने किती खून केले आणि किती निर्दयतेने केले यावर जी माहिती मिळते ती मेंदू सुन्न करणारी आहे . एकेका ठगाने शेकड्यात माणसं मारली होती हे आता खोटं वाटेल अशी परिस्थिती आहे पण तेच वास्तव आहे तेव्हाही व आजही ….बेहराम नावाच्या ठगाने 900 हून अधिक माणसे खल्लास केल्याची नोंद गिनीज बुक मध्ये आहे .
हिंदुस्तानात अठराव्या व एकोणिसाव्या शतकात रयतेची लुटमार व काटमार करणाऱ्या संघटित टोळी होत्याच की ,.

कपटी किंवा धूर्त या अर्थाचा संस्कृत स्थग या शब्दापासून ठग किंवा ठक हे शब्द बनले आहेत . अचानकपणे व मनुष्य बेसावध असताना त्यास ठार करण्याच्या कृत्याला ठगी म्हणत …. ठगांच्या खरा उपद्रव अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मोठ्या प्रमाणात वाढला आणि कोरोनाचा काळात सर्वत्र फोफावला …..रक्त न सांडता बळी घेणे आजकालच्या ठगांचे ठळक वैशिष्ट्य आहे .आधी प्रेते गाडली जायची ,प्रेते गाडण्याच्या जागेस भीळ म्हणत.

आता तर प्रेते जाळण्यासाठी जागा नाही , प्रेत जाळण्यासाठी एवढी भीड उमळली आहे की जागा मिळायला सुद्धा वेटिंग करावी लागतेय . दुर्दैवी म्हणावं की शोकांतिका …
इकडे बेड रिकामा झाला की , त्याच बेडवर पुन्हा काही दिवसांचा पाहुणा आणि थोड्याच दिवसांनी त्याला स्मशानात वेटिंग ? ….याला कालचक्र म्हणावं की भलतच काही ….. मात्र बेड नावाची वस्तू म्हणजे कोरोनाचा काळात कुबेराची खाणचं ….. मनुष्य जिवंत असो की मृत…. बेडचे इन्कम सुरूच ……
कवी भा रा तांबे म्हणतात ,जन पळभर म्हणतील हाय ! हाय !! , मी जाता राहील कार्य काय ।। सखेसोयरे डोळे पुसतील ,पुन्हा आपल्या कामी लागतील ।। ठगांचेही व्यवसाय चालतील ,पैसा रूपी जीवन जगतील ।।
मग त्यातील प्रत्येकाचा ठरलेला हिस्सा , वाटा सहज वाटतील ? रुग्ण हॉस्पिटलला दाखल करायचं असेल तर काही ठग निर्लज्जपणे विचारतात ऑक्सिजन लेव्हल किती आहे ? , सिटीस्कॅन स्कोर किती आहे ? मग जर का रुग्ण दगावणारा नसेल तर बेड उपलब्ध करून दिला जातो आणि रुग्णांची परिस्थिती नियंत्रणाबाहेर असेल तर बेड उपलब्ध नाही असं निर्लज्जपणे सांगितले जाते ….आजकाल काही ठगांकडे मोठ्या प्रमाणात महामाया जमा झालेली आहे . त्याला कारण असे की , वैद्यकीय क्षेत्रातील काही व्यक्तींकडे मेडिसिनची पदवी पण नाही पण कोरोना रुग्णांवर उपचार सुरू … अशी परिस्थिती चोपड्यात पाहायला , अनुभवायला मिळत आहे …. सात दिवसांचे पॅकेज 70 हजार रुपयात …. रुग्णाने सकाळी नऊ वाजता यायचं आणि सायंकाळी सातला घरी निघून जायचं , सात दिवसाचे सत्तर हजार रुपये द्यायचे आणि त्यात रेमडीसीवर व मेडिसीनचा खर्च अजून वेगळाच …..काय चाललंय हे ! किती ठग अजून जन्माला येतील … चोपड्याच्या जनतेला वाली तरी आहे कोण ? बिचारी बकरी किती आरोळ्या मारेल बरं ….सगळीकडे वाघ , सिंह ,लांडगे ,कोल्हे ,चित्ते टपून बसलेच आहेत की …ती एके दिवशी मरणार किंवा तिला मारणारचं.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणतीही परवानगी नसताना काही ठग कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत … मरत आहेत तर मरू द्या , अजून दोन – चार मेले तर काय फरक पडणार ?….. प्रशासन म्हणते पुरावे द्या …. सगळेच आम्ही करावं तर तुम्ही कशासाठी आहात ? पुरावे तर आहेत सगळी आहेतच …. वेळ प्रसंगी ती पण एके दिवशी प्रसिद्ध करावेच लागतील…. याशिवाय अनेक गोपनीय तक्रारी आहेतच …. पण मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ?

अहो काही कोविड हॉस्पिटलला मान्य खाटांची परवानगी असताना किती रुग्ण ऍडमिट होते , आहेत कोणी खात्री केली का ? काही ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करणारा स्वतंत्र कर्मचारी वर्ग , डॉक्टर्स ,पीपीई किट कधीच आढळून येत नाही आणि पॉझिटिव्ह रुग्णांना त्यांचे नातेवाईक बिनधास्त भेटत असतात .
सिटीस्कॅन , रुग्णांचे बिल व रेमडीसीवर यात तर काहींनी कमालीची लयलूट केली ? पण खाजगी रुग्णवाहिका यांनीही कहरच केला होता पण त्यावर जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढून खाजगी रुग्णवाहिका चालक व मालकांना मोठा दणका दिला आहे . परिपत्रकात दर निश्चित करण्यात आलेले आहेत . मारुती व्हॅन रुग्णवाहिका साठी शून्य ते दहा किलो मीटर दरम्यान पाचशे रुपये , दहा ते वीस किलोमीटर दरम्यान एक हजार रुपये , 20 ते 30 किलो मीटर दरम्यान पंधराशे रुपये व तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास प्रति किलोमीटर दहा रुपये प्रमाणे घ्यावेत असे निश्चित करण्यात आले आहे …

टाटा सुमो व जीप सदृश रुग्णवाहिकेसाठी 0 ते 10 किलोमीटर दरम्यान सहाशे रुपये , 10 ते 20 किलोमीटर दरम्यान बाराशे रुपये , 20 ते 30 किलोमीटरच्या दरम्यान अठराशे रुपये व 30 किलोमीटरपेक्षा जास्त 12 रुपये प्रति किलोमिटर … टाटा 407 रुग्णवाहिकेसाठी 0 ते 10 किलोमीटर साठी सातशे रुपये , 10 ते 20 किलोमीटरच्या दरम्यान चौदाशे रुपये ,20 ते 30 किलोमीटरच्या दरम्यान एकवीसशे रुपये व 30 किलोमीटरच्या पुढील 15 रुपये प्रति किलोमिटर .… आय सी यु कार्डिओ व्हॅन वातानुकुलित रुग्णवाहिकासाठी 0 ते 10 किलोमीटर साठी 2000 रुपये , 10 ते 20 किलोमीटर साठी 3000 रुपये , 20 ते 30 किलोमीटर साठी 4000 रुपये व 30 किलोमीटरच्या पुढील प्रत्येक किलोमीटर 20 रुपये प्रमाणे दरपत्रक निश्चित केलेले आहेत….दि .9 एप्रिल रोजीच्या जिल्हाधिकारी पत्रात सर्व स्पष्ट दिले आहे ….
आझाद चौक व परिसर वगळता संपूर्ण शहर व तालुक्यात कोरोना आहे अशी धारणा जणूकाही प्रशासनाची झाली असावी , छत्रपती शिवाजी महाराज चौकात जी कडक शिस्त आपण लावत आहात तीच शिस्त आझाद चौक व परिसरात लावून दाखवावी ही माफक अपेक्षा …आझाद चौकातील सर्व दुकाने व सर्व व्यवस्था भाजीपाला लिलाव मंडईत स्थलांतर झाली , सदर ठिकाणी शहर वाहतूक पोलिस आपल्या ताफ्यासह तिथे आले असता गर्दी पाहून त्यांनी तिथून काढता पाय घेतला , तेथील काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना रितसर परवानगी असल्याचा आव आणला , सदर बाब मी स्वतः पी आय यांच्या लक्षात आणून दिली पण सदर बाबीची चौकशी करण्याचे धाडस सुध्दा झाले नाही …हे विशेष ..
कोण म्हणतंय चोपडा बंद असतं , तुम्ही फक्त दुकानाचा शटर जवळ उभे राहा आतून तुम्हाला ठग आवाज दिल्याशिवाय राहणार नाही …चोपड्यात सर्व काही मिळतंय ,फक्त शटर जवळ उभे राहा …
काही हातच धूत आहेत , तर काही हात धुवून घेत आहेत
सब गोलमाल है भाई , खुद को संभालो और परिवार को संभालो ।।
तुम्हाला तुमची लाज वाटत नसेल , तर अशा समाजाचा भाग असल्याची आम्हाला लाज वाटायला लागली आहे
शब्दांकन
आर डी पाटील ( पत्रकार)
9860519006 , 8999671658












