भारतीय जैन संघटने तर्फे रक्तदान शिबीरास उत्तम प्रतिसाद

भारतीय जैन संघटने तर्फे रक्तदान शिबीरास उत्तम प्रतिसाद


चोपडा ( प्रतिनिधी ) — आपल्या देशात कोरोना विषाणुने थैमान घातला आहे सदरील कोरोना बाधित रूग्णांना रक्ताची गरज भासल्यास तातडीने उपलब्ध होणे साठी भगवान महावीर स्वामीचा जन्मकल्याणक महोत्सव निमित्त औचित्य साधत रक्तदान शिबीर घेण्यात आले
सविस्तर असे की, भारतीय जैन संघटने तर्फे रक्तदान शिबीर दि.२५ रोजी आसकरण ताराचंद जैन रक्तपेढीत रक्तदात्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
आज सकाळ पासून तर दुपार पर्यंत कोविडचे शासनाच्या नियमानुसार अनेकांनी रक्तदान केले यावेळी भारतीय जैन संघटनाचे अध्यक्ष क्षितिज चोरडिया व आदेश बरडीया यांनी रक्तदान देऊन शिबिराचे उद्धाघटन करण्यात आले यावेळी भारतीय जैन संघटनेचे जेष्ठ सद्स्य दिपक राखेचा, उपाध्यक्ष विपुल छाजेड, सचिव दिनेश लोडाया,विभागीय सदस्य लतीश जैन, मयूर चोपडा, प्रविण राखेचा,महावीर टाटीया आदी उपस्थित होते आसकरण ताराचंद जैन रक्तपेढीचे किरण लोहार, शितल माळी यांनी मेहनत घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More