शंभूराजे जयंती निमित्त “शिव कर्तव्य फाऊंडेशन” चे रक्तदान शिबीर आयोजित करून स्थापना



आज १४ मे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त चोपडा शहर येथे रक्तदान शिबिर आयोजित करत “शिव कर्तव्य फाऊंडेशन” ची स्थापना करण्यात आली.या निमित्ताने शहरातील आसकराचंद ताराचंद जैन ब्लड बँक येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले.यात रक्तदानासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ३१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त पणे रक्तदान केले.सुरु असलेल्या कोरोना लसीकरणामुळे रक्तदात्यांना पुढील २-३ महिने रक्तदान करता येणार नसल्याने रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण होईल या विचाराने फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यासाठी शिव कर्तव्य फाऊंडेशन चे सदस्य दिव्यांक सावंत,नाना पाटील,मंगेश पाटील,अनिल बाविस्कर, सुनिल महाजन, प्रशांत पाटील, अमोल महाजन यांनी परिश्रम घेतले.तसेच भविष्यात चोपडा तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्य करण्याच्या उद्देशाने या फाऊंडेशन ची स्थापना केल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले.नव्याने स्थापित फाऊंडेशन च्या उद्घाटनप्रसंगी परिसरातील नागरिकांनी सदस्यांचे अभिनंदन केले.














