शहर पोलीसांनी गुटखाविक्रेत्यावर आवळला कारवाईचा फास.चोपड्यात साडेचार लाख रुपयांचा गुटखा जप्त #.शहर पोलिंसाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई..#मुख्य आरोपी लागला पोलिसांचा हाती

शहर पोलीसांनी गुटखाविक्रेत्यावर आवळला कारवाईचा फास.चोपड्यात साडेचार लाख रुपयांचा गुटखा जप्त #.शहर पोलिंसाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई..#मुख्य आरोपी लागला पोलिसांचा हाती

चोपडा प्रतिनिधी  :—–


         चोपडा शहरात व तालुक्यात गुटखा माफियांची दिवसेंदिवस मुजोरी वाढतांना दिसून येत आहे , चोपड्यात दररोज सरासरी वीस लाख रुपयांचा गुटखा छुप्या मार्गाने येत असल्याचे बोलले जात आहे . गुटख्याची तष्करी वाढतांना दिसून येत आहे .त्या अनुषंगाने चोपडा शहर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले असून त्यात रात्री उशिरा टाकलेल्या छाप्यात साडे चार लाख रुपयांचा गुटखा सोबत तीन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे .


             सविस्तर वृत्त असे की , पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे , अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे  ,उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली दिनांक १७  व दिनांक १८ रोजी पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांची टीम रात्री गस्त करीत असताना मिळालेल्या गुप्त  बातमीप्रमाणे चोपडा शहरातील पाटीलगढी  भागात छापा टाकला असता रमाकांत बाबुराव मराठे यांच्या कब्जात एक्यानव  हजार पाचशे वीस रुपये किमतीच्या विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली . त्याने दिलेल्या माहितीवरून मुख्य आरोपी राहुल विश्वास गुजराथी ( गुजराथी  गल्ली चोपडा )  यास ताब्यात घेण्यात आले आहे  व दोन्ही आरोपींवर चोपडा शहर पोलीस स्टेशनला भाग पाच गुरन  १८८/ २०२१ भादवि कलम ३२८ , २७२ , २७३  प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे . अटके दरम्यान मुख्य आरोपी राहुल गुजराथी  याने दिलेल्या माहितीच्या आधारे मच्छी मार्केटमध्ये उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकप वाहन क्रमांक एम एच १९  – ५३८७ ताब्यात घेण्यात आली असता त्यात तब्बल एकवीस प्रकारच्या पानमसाला व सुगंधी तंबाखू असा एकूण तीन लाख अठ्ठावन  हजार एकशे पन्नास  रुपये किमतीच्या माल  व चार लाख रुपये किमतीची पिकअप वाहन  व चालक श्याम बडगुजर मिळून आला . सदर आरोपी यास विचारपूस केली असता त्याने सदर माल  राहुल गुजराथी  याच्या असल्याबाबत सांगितले .

नमूद गुन्ह्यातील  चार लाख एकोणपन्नास  हजार चारशे रुपये किमतीचा गुटखा व चार लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एमएच १९ –  ५३८७ असे एकूण आठ लाख एकोणपन्नास हजार चारशे  रुपये किमतीचा मुद्देमाल व तीन आरोपी यांना अटक करण्यात आली आहे . सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे , अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे , उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण ,अंबादास सैंदाणे , विलेश सोनवणे , संतोष पारधी ,प्रदीप राजपूत , ज्ञानेश्वर जवागे ,शेषराव तोरे , वेलचंद पवार ,रत्नमाला शिरसाट ,संदीप भोई ,रवींद्र पाटील यांनी केली .सदर गुन्ह्याचा  पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने पो ना  शेषराव तोरे करीत आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More