चोपडा काँग्रेसतर्फे पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात मोदी सरकारचा निषेध व आंदोलन .
चोपडा प्रतिनिधी :—
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचे सूचनेनुसार व जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष एड संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ७ जून रोजी चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे चोपडे शहरातील तीन प्रमुख पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीविरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले .

मोदी सरकारने पेट्रोल ,डिझेल व गॅसचे भाव अवाजवी वाढवले. लोकांची फसवणूक केली. जनतेची लूट केली. यासाठी जनतेत जनजागृती करण्यासाठी आणि मोदी सरकारची पोल खोलण्यासाठी मोदी सरकारचा धिक्कार करून निषेध आंदोलन करण्यात आले. चोपडा शहरातील लोहाणे पेट्रोल पंपासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी महागाईचा भस्मासुर हा बॅनर लावून वेगवेगळ्या घोषणांचे फलक धरून व मोदी सरकार विरुद्ध घोषणा देऊन आंदोलन केले. आंदोलन करताना पेट्रोल डिझेल आणि गॅसची भाव कमी झालेच पाहिजे म्हणून मागणी केली. मोदी सरकार लुटेरे सरकार ,मोदी सरकार फसवी सरकार ,मोदी सरकार हाय हाय अशा अनेक घोषणा देऊन मोदी सरकारचा धिक्कार व निषेध केला.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजबराव पाटील, चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष के डी चौधरी , चोपडा सूतगिरणीचे संचालक राजेंद्र भास्करराव पाटील ,प्रा कांतीलाल सनेर ,राज्य एन एस यु आय सचिव चेतन बाविस्कर ,तालुका काँग्रेसचे युवक अध्यक्ष किरण सोनवणे ,प्रा प्रदीप पाटील, चिराग उद्दीन जहागीरदार ,देवकांत के चौधरी ,देविदास साळुंखे ,इलियास पटेल, रोहन पाटील, युवक काँग्रेसचे व एन एस यु आय चे कार्यकर्ते आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता अनेकांनी प्रत्यक्ष भेटून काँग्रेसच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले .त्यामुळे संपूर्ण जनतेचे काँग्रेसकडून के. डी. चौधरी यांनी आभार व्यक्त केले .

अजबराव पाटील जिल्हा सरचिटणीस यांनी तसेच के डी चौधरी यांनी मोदी सरकार विरुद्ध आपले विचार व्यक्त करताना मोदी सरकार हे फसवे सरकार आहे .यांनी देशाचा विकास न करता देशाला भकास केले असे नमूद केले .यावेळी राजेंद्र भास्करराव पाटील, चेतन बाविस्कर यांनी मोदी सरकार विरुद्ध घोषणा देऊन वातावरण चांगलेच तापवले. त्यानंतर क्रमाक्रमाने चोपडा शहरातील बडगुजर पेट्रोल पंपाजवळ तसेच कारगिल चौकाकडील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. यानंतरच्या पुढील काळात विद्यार्थ्यांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे चेतन बाविस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. सर्वात शेवटी के .डी .चौधरी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन केल्याने आभार व्यक्त केले. शेवटी सोनिया गांधी जिंदाबाद ,राहुल गांधी जिंदाबाद ,नाना पटोले जिंदाबाद ,संदीप पाटील जिंदाबाद, जय जवान जय किसान अशा घोषणा देऊन आंदोलन झाले.












