चोपडा प स उपसभापती पदी राष्ट्रवादीचे सूर्यकांत खैरनार यांची बिनविरोध निवड,सेनेचे सदस्य गैरहजर

चोपडा प स उपसभापती पदी राष्ट्रवादीचे सूर्यकांत खैरनार यांची बिनविरोध निवड,सेनेचे सदस्य गैरहजर


चोपडा( प्रतिनिधी)

भाजपच्या मदतीने चोपडा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी वर्डी गणातील सूर्यकांत खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सूर्यकांत खैरनार यांच्या अर्जाला प स सदस्य भूषण भिल हे सूचक होते.


राष्ट्रवादीच्या अमिना तडवी यांनी पंचायत समिती उपसभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी दि ८ रोजी तहसिलदार अनिल गावित यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती हॉलमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीत वर्डी गणातील राष्ट्रवादीचे सूर्यकांत खैरनार यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी १२ पैकी सभापती प्रतिभा पाटील सह १० प स सदस्य हजर होते तर सेनेचे प स सदस्य भरत बाविस्कर व एम व्ही पाटील गैरहजर होते.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, तर भाजपचे जि प सदस्य गजेंद्र सोनवणे,बापूराव पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More