लासुर प्राथमिक आरोग्य केंद्राला इंड्रेस + हौसेर गृप कडून 2 ऑक्सिजन कॉंसेनट्रेटर मशिन भेट’..

लासुर प्राथमिक आरोग्य केंद्राला इंड्रेस + हौसेर गृप कडून 2 ऑक्सिजन कॉंसेनट्रेटर मशिन भेट’..
चोपडा प्रतिनिधी :—


लासुर हे सातपूडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले गाव. लासुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला पंचक्रोशीतील गावांसह आदिवासी पाडा ,वस्ती,इत्यादी गावे जोडली आहेत.कोरोना महामारीमुळे वैद्यकीय सोयी सुविंधा अपूर्‍या पडल्यात , अनेक कोरोना बाधितांना आपले प्राण गमवावे लागलेत,शासकीय रुग्णालयावर अतिरीक्त ताण आला,खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी सर्व सामान्य नागरिकांना उपचार करणे अर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे शक्य नाही.
लासुर गावासाठी व आदिवासी नागरिकांच्या, कोरोना बाधित रुग्णांच्या वैद्यकिय सेवेसाठी लासुरचे भूमिपूत्र सुधिर अशोकराव वाघ पाटील सिनियर मॅनेजर व त्यांचे वरिष्ठ सहकारी अंकुश बागलाणे यांनी आपल्या इंड्रेस हौसेर ऑटोमेशन इन्स्ट्रुमेशन प्रा लि कडून लासुर प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन व वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला एक असे एकूण तीन आॕक्सिजन काॕन्सट्रेटर मशिन भेट देण्यात आले.
त्यामुळे आॕक्सिजनची कमतरता दुर होण्यास मदत मिळणार आहे..


या सामाजिक बांधिकलकी जपण्याच्या उपक्रमाचे लासुर येथिल सर्व अबाल वृध्दांनी कौतुक केले आहे,
लासुर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे होते,यावेळी प्रमुख अतिथि म्हणून तालुका वैद्यकिय अधिकारी डाॅ.प्रदिप लासुरकर,डाॅ.गुरुप्रसाद वाघ,सेवानिवृत्त अमृतराव वाघ,लासुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डाॅ.निळे,डाॅ.प्रशांत पाटील,डाॅ.महेंद्र पाटील,डाॅ.चौधरी,
सर्व वैद्यकिय स्टाफ,लासुर येथिल डाॅ.अरुण देसले,डाॅ.रमेश कोठारी,डाॅ.राजेंद्र महाजन,डाॅ.अशोक पाटील, यांचे अनमोल सहकार्य लाभले,


तसेच लासुर विकास सोसा.माजी चेअरमन हिंमतराव महाजन,संत सावता पतपेढीचे चेअरमन गोकुळ माळी,लासुर ग्राम पंचायतचे उपसरपंच अनिल वाघ,विकास सोसा.चेअरमन विठ्ठल पाटील,माजी मुख्याध्यापक आर.एन. पवार , श्री.नाटेश्वर पिक संरक्षण सोसा.चे व्हाॅ.चेअरमन बाळुभाऊ कोळी,तंटामुक्ती चे उपाध्यक्ष उपेंद्र पाटील ,विविध कार्यकारी सोसा. चे संचालक युसुफ खाटीक,बाळुभाऊ सोनवणे,श्रीराम पालिवाल,मगन महाजन,भिकन महाजन,गुणवंत वाघ,चंद्रकांत पाटील,अजय पालीवाल,तुषार वाघ,कुंदनलाल बोरसे, भरत सोनगिरे, दिशेन वाघ,
नरेंद्र महाजन,शिवाजी पाटील,लक्ष्मण बाविस्कर,गोरख पाटील व पत्रकार दिलीप पालीवाल आदि उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More