
श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र येथे मोफत प्रवेश प्रक्रिया समुपदेशन कक्ष
चोपडा प्रतिनिधी :—

महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र ची सूरूवात सन १९९२ पासून होऊन त्यात विविध विभाग कार्यरत आहेत. बी. फ़ार्मेसी महाविद्यालयाची प्रवेश क्षमता ही १०० असुन नुकतेच शैक्षणिक वर्ष २०२० – २०२१ पासून महाविद्यालयात पदविका (डी.फार्मसी) अभ्यासक्रमा साठी ६० विद्यार्थी संख्ये करीता मान्यता मिळाली आहे.


बी. फार्मसी महाविद्यालयास ए .आय. सी. टी. ई. नवी दिल्ली मार्फत एन. बी. ए चे मानांकन सलग दुसऱ्या वेळी प्राप्त असून आय. एस. ओ. प्रमाणीत आहे. सीईटी सेल , महाराष्ट्र राज्य तर्फे बी.फार्मसीच्या प्रवेशासाठी लागू असलेली MHTCET- २०२१ परीक्षेकरीता संबंधीत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करण्याची अर्ज सादर करण्याची सुरुवात झालेली शेवटची मुदत ७ जुलै २०२१ दिलेली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना सी.ई.टी.परीक्षा अर्ज भरावयाचा असेल अशा विद्यार्थ्यांना श्रीमती शरदचंद्रीका सुरेश पाटिल काँलेज आँफ फार्मसी चोपडा जि.जळगांव येथे विनामुल्य मार्गदर्शन करण्यात येईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी .


विविध प्रवेश प्रक्रिया विषयक समुपदेशनासाठी व प्रवेश प्रक्रिये करीता लागणाऱ्या विविध कागदपत्रं विषयी माहिती करता अधिकाधिक विद्यार्थ्यांनी समुपदेशनकक्षाचा लाभ घ्यावा असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम प्रकाश वडनेरे यांनी केले असून तसेच सदर समुपदेशन कक्षाचा कोविङ काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होईल अशी अपेक्षा महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एड. संदीप सुरेश पाटील, सचिव
डॉ.सौ. स्मिता संदीप पाटील यांनी व्यक्त केली आहे…












