आडगाव दलित वस्ती सुधार योजनेच्या पाणीपुरवठ्याच्या कामासंबंधीचा प्रश्न सुटता सुटेना , चौकशीस ठेकेदार गैरहजर ,
दोन्ही चौकशी ठरल्या निष्पळ…

चोपडा प्रतिनिधी :—–
चोपडा तालुक्यातील आडगाव येथील दलित वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत पाणीपुरवठा कामासाठी झालेल्या कामाचे वरिष्ठ पातळीवर चौकशी झाल्याशिवाय ठेकेदारास पेमेंट न करणे बाबतचा अर्ज उपसरपंच सोमनाथ पाटील यांनी दि २४ मे रोजी वरिष्ठांना दिला होता .

सदर कामाच्या प्रथम चौकशीसाठी धीरज राजेंद्र पाटील ( उपअभियंता ग्रामपंचायत पाणीपुरवठा उपविभाग अमळनेर ), डी व्ही बोरसे (कनिष्ठ अभियंता ग्रामपंचायत पाणीपुरवठा उपविभाग अमळनेर) , एस पी मोरे (कनिष्ठ अभियंता ग्रामपंचायत पाणीपुरवठा उपविभाग अमळनेर ) तसेच प्रशांत भाईदास वानखेडे ग्रामसेवक आडगाव हे सदर कामाची चौकशी कामी आडगाव येथे आले असता कोरोनाचा पार्श्वभूमीवर पाच पेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकत नाहीत व १४४ कलम लागू असल्याचे कारण सांगून सदर कामाची चौकशी न करता त्यांनी काढता पाय घेतला होता .
दुसऱ्या चौकशीसाठी चोपडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस टी मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी सरपंच व उपसरपंच दोघांचेही म्हणणे ऐकून लेखी स्वरूपात तक्रारी लिहून घेतल्या आहेत , पण सदर चौकशी दरम्यान ठेकेदार अनुपस्थित राहिल्यामुळे चौकशी पूर्ण होऊ शकली नाही , जर पुढच्या चौकशीस ठेकेदार गैरहजर राहिला तर सदर ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारदार उपसरपंच सोमनाथ पाटील यांनी केली आहे .

आडगाव तालुका चोपडा येथील दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन २०१९-२० या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या पाईप लाईन व पाण्याची टाकी तसेच मशिनरी साहित्य इत्यादी काम मंजूर झालेले असून सदरील दलित वस्तीत सदरचे मंजूर कामे हे प्रत्यक्षात झालेले नसून सदरच्या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाल्याशिवाय सदर ठेकेदारास कोणतेही पेमेंट धनादेश ( रक्कम ) अथवा रोखीने अदा करू नये या संबंधित लेखी तक्रार पंचायत समिती चोपडाचे गट विकास अधिकारी यांना दिलेली असून अद्याप पर्यंत त्यांनी सदर प्रकाराची दखल घेऊन कार्यवाही केलेली नाही आणि सदर काम झाले नसून सुद्धा पंचायत समितीचे इंजिनियर यांनी सदर च्या कामाची एमबी तयार करून घेतली आहे तरी सदर कामाची चौकशी करण्यास सांगून योग्य न्याय मिळावा यासंदर्भाचे लेखी पत्र उपसरपंच सोमनाथ पाटील यांनी गटविकास अधिकारी तसेच आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे ,पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे ..
जर चौकशी निःपक्षपाती झाली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा उपसरपंच सोमनाथ पाटील यांनी दिला आहे..













