माचला शिवाराच्या फॅक्टरीतून वीस लाखांचे साहित्य चोरीला # तीन दिवसात दोन वेळा झालेल्या चोरीत लाखो रुपयांचा ऐवज लंपास

माचला शिवाराच्या फॅक्टरीतून वीस लाखांचे साहित्य चोरीला # तीन दिवसात दोन वेळा झालेल्या चोरीत लाखो रुपयांचा ऐवज लंपास.


चोपडा प्रतिनिधी :— प्रवीण देवराम निकम यांच्या माचला शिवारात सिमेंटचे पाईप बनवण्याची फॅक्टरी आहे . माचला गावाजवळ ते माचला फाटा रोड लगत असलेल्या शेतात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून प्रवीण देवराज निकम यांचा सिमेंटचे पाईप बनवण्याच्या व्यवसाय असून शेतात खुल्या जागेत सदरचे पाईप बनवण्यासाठी साहित्य ठेवलेले होते.


दिन १७ जून रोजी रात्री अंधाराच्या फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सिमेंट पाईप बनवण्याचे साहित्य चोरीला नेल्याची घटना घडली आहे .त्यात २४ हजार किमतीचे दोन नग , ६८ हजार रुपये किमतीचे चार नग , ९० हजार रुपये किमतीचे सहा नग , १६ हजार रुपये किमतीचे दोन नग , ४० हजार रुपये किमतीचे चार नग, २० हजार रुपये किमतीचे चार मग ,२० हजार किमतीचे दहा नग ,१६ हजार रुपये किमतीचे दोन नग , ३० हजार रुपये किमतीचे दोन नग , १४ हजार रुपये किमतीचे दोन नग , ६० हजार रुपये किमतीचे चार नग , ६० हजार रुपये किमतीचे पाईप उचलण्याचे लोखंडी क्रेन असा एकूण अंदाजे पाच लाख ६८ हजार रुपये किमतीच्या सिमेंट पाईप बनवण्याच्या मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.


तसेच दिनांक २१ जून रोजी रात्रीच्या पुन्हा फायदा घेत त्यांच्या फॅक्टरीतील सिमेंट प्रोडक्टचे सिमेंट पाईप बनवण्याचे साहित्य पुन्हा चोरट्यानी चोरून नेल्याची दुसऱ्यांदा घटना घडली आहे. त्यात दोन लाख २५ हजार रुपये किमतीचे दोन नग, ३८ हजार रुपये किमतीचे दोन नग ,१६०००० रुपये किमतीचे आठ नग, ७५००० रुपये किमतीचे तीन नग, एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे चार नग, ८०००० हजार रुपये किमतीचे दोन नग , ९०००० हजार रुपये किमतीचे दोन नग, एक लाख चार हजार रुपये किमतीचे दोन नग , एक लाख रुपये किमतीचे दहा नग , एक लाख साठ हजार रुपये किमतीचे दोन नग , ८८००० हजार रुपये किमतीचे दोन नग, ३५००० हजार रुपये किमतीचे टायर रॉड , ९०००० रुपये किमतीचे फेवर मोल्ड असे दुसऱ्या दिवशी १३लाख ८५ हजार रुपये किमतीचे सिमेंट पाईप बनवण्याचे लोखंडी साहित्य चोरीला नेल्याची घटना प्रवीण निकम यांच्या सिमेंट पाईप बनवण्याच्या कारखान्यात घडली आहे

.दोन दिवसांच्या चोरीत १९ लाख ५३ हजार किमतीचे साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. सलग दोन दिवस झालेल्या चोरीमुळे चोरांची वाढलेली मुजोरी व पोलिसांच्या कमी झालेला दबदबा यावरून दिसून येतो . प्रवीण देवराम निकम यांच्या स्वमालकीच्या फॅक्टरीतून सलग दोन दिवस चोरी होणे एक मोठा चर्चेचा विषय आहे. तरी झालेल्या चोरीचा छडा लावणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान ठरले आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More