कोविड लसीकरण बाबत आदिवासी बांधवांमध्ये आदिवासी सेवक संजय शिरसाठ करताय जनजागृती

कोविड लसीकरण बाबत आदिवासी बांधवांमध्ये आदिवासी सेवक संजय शिरसाठ करताय जनजागृती
चोपडा प्रतिनिधी –


चोपडा तालुक्यात आदिवासी बांधव यांची संख्या मोठया प्रमाणावर आहे.सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावे व वस्ती,पाडे येथे वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांना कोविड लसीकरण बाबत पुरेसे असे ज्ञान वजा माहिती नसल्याने ते लसीकरण करण्यासाठी पुढे सरसावत नाही.ही बाब आदिवासी सेवक संजय पांडुरंग शिरसाठ यांच्या लक्षात आल्याने त्यांनी माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे,आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या आदेशान्वये आदिवासी भागात जाऊन जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

तालुक्यातील शेवरे बु||,उनपदेव येथे आदिवासी बांधवांना एकत्रित करून त्यांनी या लसीकरणाचे फायदे सांगितले.लसीकरणामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नसून या लसीकरणासाठी आपण पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.आदिवासी सेवक संजय शिरसाठ यांच्या मार्गदर्शनामुळे आदिवासी भागात जनजागृती होत असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.याप्रसंगी वरगव्हाण ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच सुरमान वेलजी बारेला गनदास बारेला,देवसिंग पावरा,उपसरपंच प्रताप बारेला, कमलेश बारेला, जगदिश बारेला, गजिराम पावरा, खुमसिंग महाराज, सत्तरसिंग बारेला,सौ नायजाबाई पावरा,सौ समराबाई पावरा, मधुकर भिल,गुडा पावरा,भायला पावरा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More