तालुका समन्वय समिती बैठकीत
आमदार लताताई सोनवणे यांनी घेतला सर्व विभागांचा आढावा
चोपडा प्रतिनिधी :—
चोपडा तालुका समन्वय समितीची बैठक तहसिल कार्यालय येथे आमदार लताताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

आढावा बैठकीत प्रथम पोलीस प्रशासनाच्या स्थितीचा आढावा चोपडा शहर पो.नि.अवतारसिंग चव्हाण, चोपडा ग्रामीण सहा.पो.नि संदीप आराक , अडावद सहा.पो.नि. किरण दांडगे यांनी सादर केला, यात मनुष्यबळ कमतरता, रिक्त पदे, पोलीस कर्मचारी / अधिकारी निवासस्थानाबाबत अडचणी मांडल्या असता आ.लताताई सोनवणे यांनी निवासस्थानासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास तात्काळ प्रस्ताव बनविण्याचे निर्देशित केले.

आ.लताताई सोनवणे यांनी नुकतेच सिंचन विभागास केलेल्या सूचनेवर अंमलबजावणी करण्यात आली असल्याचे सिंचन अभियंत्यांकडून आढावा सादर करण्यात आला. वीजवितरण विभागास आवश्यक ठिकाणी जीर्ण तारा तात्काळ बदल करण्याचे आदेश देण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागास मुख्य रस्त्यावरील रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्या छाटण्याचे तसेच रस्त्यावरील खड्डे बुजण्याचे आदेश देण्यात आले. तसेच पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छतेबरोबरच शेतकरी हितास प्राधान्य द्यावे. सुचविलेली कामे विहित वेळेत पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांवर राहील. त्यानुसारच कामांचे नियोजन करावे. कामे तातडीने पूर्ण होतील याकडे संबंधित यंत्रणांनी व विभाग प्रमुखांनी लक्ष द्यावे.

शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांना कर्जमाफी संबधी शासनाच्या वतीने योग्य ते मार्गदर्शन करण्याचे आ.लताताई सोनवणे यांनी सूचित केले.
बैठकीस आमदार लताताई सोनवणे, सभापती प्रतिभा पाटीलसदस्य,एम. व्ही. पाटील सर. अॅड. शिवराज पाटील,कैलास बाविस्कर, ज्ञानेश्वर अहिरे,सौ. ताराताई पाटील,श्रीमती शोभाताई देशमुख,पुष्पाताई जैनवतहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी बी.एस.कोसोदे, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मनोज पाटील, पो.नि. अवतारसिंग चव्हाण, सहा.पो.नि. संदीप आराक, सहा.पो.नि. किरण दांडगे, वीज वितरणचे एन.एस.रासकर आदि उपस्थित होते.













