चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ मनोज पाटील यांचा डॉक्टर डे च्या दिवशी एबीपी माझानं केला सन्मान

चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ मनोज पाटील यांचा डॉक्टर डे च्या दिवशी एबीपी माझानं केला सन्मान
चोपडा प्रतिनिधी :—-


कोविडच्या भयावह परिस्थितीत खंबीर व संयमीपणे तोंड देत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज पाटील यांनी यशस्वीपणे शहराची व तालुक्याची परिस्थिती हाताळल्यामुळे , तसेच उपजिल्हा रुग्णालयात केवळ १०० खाटांची व्यवस्था असतांना २०० च्या वर रुग्णांना अहोरात्र सेवा दिली आहे तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुमारे २००० रुग्णांवर उपचार केले आहेत .त्यांच्या कार्याची दखल घेत एबीपी माझा या वृत्त वाहिनीतर्फे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा नुकताच गौरव करण्यात आला आहे


डॉक्टर डे च्या दिवशी एबीपी माझा या वृत्त वाहिनीवर थँक्स डॉक्टर या कार्यक्रमात त्यांचा कार्याची दखल घेतली आहे , सदर कार्यक्रम प्रसंगी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते .
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चोपडा तालुक्यात ही मोठा उद्रेक पाहायला मिळाला होता,या वेळी चोपडा उप जिल्हा रुग्णालयात केवळ शंभर खाटाची व्यवस्था असताना रुग्णालयाचे अधीक्षक डॉ मनोज पाटील यांनी मात्र रोज येणाऱ्या दोनशे ते अडीचशे रुग्णावर शर्थीचे प्रयत्न करून अनेक रुग्णांना मृत्यू च्या दाढेतून बाहेर काढले आहे ,अतिशय प्रतिकूल परिस्थिती मध्ये त्यांनी ग्रामीण भागातील गरजू रुग्णांवर चांगले उपचार केल्याने डॉ मनोज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी चांगली ओळख निर्माण झाली आहे .त्यांच्या या कार्याचा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे,पालकमंत्री गुलाबराव पाटील , आमदार सौ लताताई सोनवणे आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गौरव केला आहे


डॉ मनोज पाटील हे २०१४ चोपडा उप जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत , गेल्या अनेक वर्षां पासून ते आरोग्य सेवा देत असतांना मागील वर्षी कोरोनाचे संकट उभे राहीले त्या वेळी सर्वाच्या मनात कोरोनाची भीती होती. अगदी अनेक तज्ञ डॉक्टर सुद्धा रुग्णांना उपचार करतांना धास्तावले होते,डॉ मनोज पाटील आणि त्यांचे कुटुंबीय देखील त्याला अपवाद नव्हते ,कोरोनाच्या भीतीने डॉ मनोज पाटील यांच्या कुटुंबियांच्या कडून त्यांनी नोकरी सोडून घरी बसावं या साठी मोठा दबाव निर्माण केला जात होता,मात्र ज्यावेळी रुग्णांना आपली खरी गरज आहे ,त्यावेळी आपण नोकरी सोडून घरी बसावे हे डॉक्टर मनोज पाटील यांच्या विचारात बसत नव्हते,आपण डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर जनतेची सेवा करण्याची शपथ घेतली आहे त्याची आठवण त्यांनी आपल्या कुटुंबियांना करून देत त्यांची समजूत घातली आणि आपली वैद्यकीय सेवा त्यांनी सुरूच ठेवली ,आपल्या मुळे आपले कुटुंबीय अडचणीत येऊ नये यासाठी डॉक्टर मनोज पाटील यांनी तीन महिने कुटुंबियांच्या पासून स्वतःला अलिप्त ठेवले होते .


चोपडा तालुक्याचा विचार केला तर ग्रामीण भाग असल्याने कोरोनाच्या बाबत काळजी घेण्या बाबत ज्या काही खबरदारी नागरिकांनी घ्यायला पाहीजे होत्या, त्या पाहीजे त्या प्रमाणात नागरिक घेत नसल्याने, अनेक रुग्ण हे कोरोना बाधीत झाल्यावर काही दिवस घरीच उपचार करून घेण्याचा प्रयत्न करीत होते . यामध्ये अनेक वेळा उपचार करण्यात उशीर झाल्याने अनेक रुग्ण गंभीर झाल्यावर मग सरकारी रुग्णालयात दाखल होत असत अशा गंभीर झालेल्या रुग्णांनावर उपचार करताना आणि त्यांचे जीव वाचविण्यासाठी डॉ मनोज पाटील आणि त्यांच्या सहकार्यांना मोठ्या शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते,केवळ शंभर खाटा उपलब्ध असतांना दोनशे ते सव्वा दोनशे रुग्ण रोज दाखल होत असल्याने या रुग्णांना बेड उपलब्ध करून देतांना अनेक अडचणी येत असल्या तरी रुग्णालयात ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी रुग्णांना दाखल करून घेत डॉक्टर मनोज पाटील यांनी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला परत न पाठवता त्याच्यावर यशस्वी उपचार केले आहेत .कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विचार केला तर चोपडा उप जिल्हा रुग्णालयात दोन हजार रुग्णांनी उपचार घेतले आहेत. यातील सोळाशे रुग्ण बरे होऊन परतले आहेत तर यातील दोनशे अठरा रुग्णांचे मृत्यू झाले आहेत तर १२५ रुग्ण हे गंभीर असल्याने त्यांना इतर ठिकाणी हलविण्यात आले आहेत.
कोरोनाच्या काळात काही रुगांचा मृत्यू झाला आहे त्याचे आपल्याला नक्कीच दुःख आहे मात्र यातील अनेक रुग्ण उशिरा दाखल झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुनंदा गुरव सूर्यवंशी ही भारतीय लष्करात सेवा करणाऱ्या अरुण सूर्यवंशी जवानांची आई चोपडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती ,मात्र कोरोनाचा संसर्ग अधिक वाढल्याने त्यांची गंभीर होत चाललेली प्रकृती बघून, खासगी डॉक्टरने त्यांना इतर ठिकाणी हलविण्याचा सल्ला जवानाला दिला होता,आपल्या आईची गंभीर परिस्थिती पाहून
जवानांने आपल्या आईला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते,याच काळात त्याची सुटी संपल्यावर जवानाला पुन्हा सीमेवर देश रक्षणासाठी जावं लागणार असल्याने ,जवानाने आपल्या आईला सुनंदा सूर्यवंशी यांना डॉ मनोज पाटील यांच्या हवाली करतांना ,माझी आई तुमच्या सुपूर्द करीत असल्याचे सांगून आपल्या कर्तव्यावर जाणे पसंत केले होते,एक जवान देश सेवे साठी आपल्या आईला आपल्या विश्वासावर सोडून जात असल्याची जाणीव मनात ठेवून डॉ मनोज पाटील यांनीही सुनंदा सूर्यवंशी यांना आपल्या आईच्या जागी पाहत तिच्या वर दीड महिना उपचार करीत अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून तिला बाहेर काढले आहे,अनेक रुग्णांवर उपचार करीत असतानाही सुनंदा गुरव यांचे वाचलेले प्राण हे आपल्यासाठी खूप मोठं समाधान असल्याची भावना डॉ मनोज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
याशिवाय त्यांनी उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या सुविधा त्यात ऑक्सिजन सिलेंडर , ऑक्सिजन कॉन्सट्रेटर , बेड यासह विविध सुविधा तात्काळ उपलब्ध करून दिल्या आहेत .


उपचारासाठी आलेल्या प्रत्येक रुग्णास त्यांनी बेड उपलब्ध करून दिला आहे .त्यांचा या अष्टपैलू कामगिरीची दखल एबीपी माझा या वृत्त वाहीनीने घेतली आणि संपादक राजीव खांडेकर यांच्या स्वाक्षरीचे सन्मानचिन्ह जिल्हा प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांच्या हस्ते देऊन त्यांना गौरविण्यात आले .
यावेळी शेतकरी कृती समितीचे एस बी पाटील , डॉ गुरुप्रसाद वाघ , डॉ पंकज पाटील , डॉ नरेंद्र पाटील , डॉ हेमंत पाटील , डॉ तृप्ती पाटील , पत्रकार आर डी पाटील व उपजिल्हा रुग्णालयाचा सर्व स्टाफ उपस्थित होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More