सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याने अमृत महाजनच्या निषेधार्थ पत्रकारांचे निवेदन

चोपडा ( प्रतिनिधी ) — येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाअध्यक्ष कॉ. अमृत महाजन यांनी
व्हॉटसेअपवर पत्रकाराबद्द्ल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याने तालुक्यातील सर्व पत्रकारांनी मिळून आज दि २६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कचेरीवर व पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले

सविस्तर असे की, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाअध्यक्ष कॉ.अमृत महाजन यांनी विधानसभेच्या निवडणुकी काळात मीडियाचा सर्वेत भाजपाला जास्त जागा दाखवत असल्याने त्यांचा राग येऊन अमृत महाजन यांनी दि २१ ऑक्टो. रोजी चोपडा शहर पब्लिक , पत्रकार सृष्ठी आणि सर्वधर्म समभाव या तीनही व्हॉटसेअप ग्रुपवर भाडखाऊ मीडिया सर्वेत भाजपाला नंबर 1चा पक्ष दाखवू लागले आहेत या आशेयाचे मजकूर टाकले होते या आक्षेपार्ह मजकुराने पत्रकारांची समाजातील प्रतिमा मालिन व्हावी या उद्देशाने हेतुपुरस्कर हा मॅसेज प्रसारित केला गेला आहे तरी देशभरातील सर्व पत्रकारांची इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, पोर्टल न्युज याक्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मीडिया सहकाऱ्याची बदनामी केली म्हणून आज तालुक्यातील सर्व पत्रकारांची चोपडा विश्रामगृहाला जेष्ठ पत्रकार अनिलकुमार पालिवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत अमृत महाजन यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणीचा निर्णय घेण्यात आला तसेच त्यांची एकही बातमी कोणीही छापू नये असा निर्णय घेण्यात आला आणि शासन , प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा याचे पडसाद राज्यभरात उमटतील असा इशाराही यावेळी देण्यात आला तद्नंतर तहसील कचेरीवर मंडल अधिकारी अमृतराव वाघ यांना निवेदन देण्यात आले व सहा.पोलीस निरीक्षक मनोज पवार, सहा.पोलीस निरीक्षक श्री उनवणे यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित पत्रकारांनी अमृत महाजन हाय हाय , अमृत महाजन यांना अटक व्हायलाच पाहिजे, पत्रकारांना बद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य करणाऱ्या अमृत महाजणाचा निषेध असो अश्या विविध घोषणा देत निवेदन देण्यात आले यावेळी शासन ,प्रशासनच्या वतीने अमृतराव वाघ, यांच्या सह सहा.पोलीस निरीक्षक श्री उनवणे आणि मनोज पवार यांनी बोलताना सांगितले की, आपल्या भावनांचा विचार करून आम्ही लवकरच कारवाई करू असे असे आश्वासन दिले यावेळी तालुक्याभरातून इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते












