बैलपोळा निमित्त चोपडा तालुक्यातील भारडु येथे ऐतिहासिक बैलजोडी सजावट स्पर्धा

बैलपोळा निमित्त भारडु येथे ऐतिहासिक बैलजोडी सजावट स्पर्धा

कृषी संस्कृतीतील महत्त्वाचा सण म्हणजे बैल पोळा ह्या सणाचे औचित्य साधून चोपड्या तालुक्यातील भार्डू या शेतीला पंढरी मानणाऱ्या आदर्श गावाने बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनोख्या ऐतिहासिक बैलजोडी सजावट स्पर्धेच्या माध्यमातून एक आदर्श घालून दिला.


भारडु या गावी बैलपोळा निमित्त बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात 25 बैलजोड्या सहभागी झाल्या. तसेच त्या 25 बैलजोडी यांचे परीक्षण डॉ संजय गुजराथी, डॉ एस बी कणके, तसेच आदर्श शेतकरी श्री एस बी पाटील, पारस पिरण पाटील, निंबा श्रीराम पाटील, योगेश शिवाजी देसले यांनी केले परीक्षण करत असतांना बैलाचे डोळे, दात, कान, अंडाशय, कातडी, खुर, खांदा, शेपटी यांना 15 गुण तसेच सुदृढता व सजावट यांना 10 गुण असे एकूण 25 गुण पैकी ज्या-त्या बैलजोडी चे परीक्षण करण्यात आले व त्या नुसार गुणांकन करण्यात आले त्यात सर्वात जास्त गुण प्राप्त 3 उत्कृष्ट सजावट केलेल्या बैलजोडी व आपल्या बैलजोडीची उत्तम निगा राखणाऱ्या स्पर्धकांचे नंबर काढण्यात आहे व बक्षिस देण्यात आले त्यात प्रथम क्रमांक महेश आत्माराम पाटील यांनी पटकवला असून त्यांना 5001 रु रोख रक्कम व 100 किलो ढेप देण्यात आली. दुसरा क्रमांक श्री संभाजी धर्मा पाटील यांनी पटकवला असुन त्यांना 3001 रु रोख रक्कम व 75 किलो ढेप तसेच तिसरा क्रमांक श्री युवराज हिलाल पाटील यांनी पटकवला असुन त्यांना 2001 रु रोख रक्कम व 50 किलो ढेप देण्यात आली तसेच पारितोषिक वितरण गावातील पोलीस पाटील श्री मधुकर भटा अहिरे, माजी सैनिक श्री धनराज वंजी पाटील व श्री दिलीप एकनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


ही ऐतिहासिक बैलजोडी सजावट स्पर्धा सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष अँड एस डी सोनवणे यांच्या संकल्पनेतुन आयोजीत करण्यात आली तसेच विकास सोनवणे, रघुनाथ पाटील, रोहिदास सोनवणे, धुडकू पाटील, सतीलाल पाटील, वसंत पाटील, दिनेश पाटील व सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचलन चि रोहन किशोर सोनवणे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिलींद सोनवणे, नरेंद्र पाटील, संदीप पाटील, सागर पाटील यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More