चोपड्यात गणपती विसर्जनाच्या दिवशी आम आदमी पक्षात अनेकांनी केला पक्ष प्रवेश …
चोपडा प्रतिनिधी:–
चोपड्यात आम आदमी पक्षाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे . चोपडा शहरात पाचव्या दिवशी श्रींचे विसर्जन केले जाते. श्रींच्या विसर्जनाच्या दिवशी आम आदमी पक्षातर्फे गणेश मंडळांच्या स्वागतासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला होता .सदर स्वागत कक्षामार्फत गणेश मंडळाच्या प्रत्येक अध्यक्षाचे श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत होते. गणेशोत्सवाच्या मिरवणुकी दरम्यान आम आदमी पक्षाने उभारलेल्या स्वागत कक्षाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत होते.


गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांनी आम आदमी पक्षात स्वतःहून जाहीर प्रवेश करून आम आदमी पक्षास जाहीर पाठिंबा जाहीर केला त्यात निवृत्ती बडगुजर भूषण धनगर अनिल महाजन आसिफ उस्मान राजेंद्र साळुंखे आरडी पाटील ईश्वर सोनवणे हर्षल सोनवणे कृष्णा बोरसे पंकज सोनवणे प्रकाश बी पाटील निलेश सोनार भूषण महाजन राकेश पाटील लीलाधर चौधरी दीपक पाटील आदींनी जाहीर प्रवेश केला.

स्वागत कक्षात स्वागतासाठी जिल्हा सहसंयोजक विठ्ठलराव साळुंखे , जिल्हा प्रसिद्ध प्रमुख रईस खान ,तालुका संयोजक आर डी पाटील, शहर संयोजक सुधीर पाटील ,तालुका सहसंयोजक समाधान बाविस्कर ( पश्चिम भाग ) , तालुका सहसंयोजक कृष्णा सोनवणे ( पूर्व भाग ) , तालुका सचिव राकेश पाटील , शहर सचिव रामचंद्र भालेराव , प्रशांत बुवा ,हसन तेली ( युवा शहर संयोजक ) , समाधान पटाईत, समाधान भालेराव, शैलेंद्र पवार, कमलेश बारेला, रतिलाल भिल्ल, हिम्मत मोरे ,शेख जलीस अहमद आदी उपस्थित होते…













