*पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेत नीट परीक्षेतील गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न*
चोपडा प्रतिनिधी :
येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज उच्च माध्यमिक विद्यालय आणि पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल मधील इयत्ता १२ वीतील नीट परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा गौरव पालकांसह करण्यात आला. संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित गौरव सोहळा कार्यक्रमात संस्थेतील दोन्ही विभागातील नीट परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी पंकज ग्लोबल पब्लिक स्कुलचा विद्यार्थी अथर्व अजय सुभेदार याने नीट परीक्षेत ६७५ गुण प्राप्त करत ऐतिहासिक यश संपादन केले. *विशेष बाब म्हणजे अथर्व सुभेदारची KVPY म्हणजे किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना मध्ये निवड झाल्याने पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल चा दुसरा विद्यार्थी सदर योजनेत निवड झाल्याने विद्यालयासाठी ऐतिहासिक नोंद ठरली आहे. शाळा स्थापनेपासून कमी कालावधीत दोन विद्यार्थ्यांची केव्हीपीवाय मध्ये निवड करणारी परीसरातील एकमेव पब्लिक स्कुल ठरली आहे.


तर आपल्या आजारपणावर मात करत जिद्द आणि चिकाटीने समर्थ जोगेंद्र हुंडीवाले याने ६०९ गुण प्राप्त करत दैदिप्यमान यश संपादन केले. पंकज उच्च माध्यमिक विद्यालयातील मानसी किरण पाटील हिने आपल्या अप्रतिम नियोजनाने ५७३ गुण संपादन करत नेत्रदिपक यश प्राप्त केले.पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेतील इयत्ता १२ वी पास नीट परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करणारे गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अथर्व अजय सुभेदार , समर्थ जोगेंद्र हुंडीवाले ,मानसी किरण पाटील ,वैष्णवी किशोर पाठक ,तुषार शशिकांत बागुल ,अनघा पराग पाटील ,प्रियांश पवार ,ज्ञानेश्वरी प्रदीप पाटील ,दिव्या कांतीलाल पाटील,हर्षवर्धन चंद्रशेखर चौधरी निखिल राजेंद्र महाजन ,अर्जुन केशरसिंग पाटील , रोहिणी रवींद्र माळी या सर्व गुणवंतांचे संस्थेतर्फे पालकांसह सत्कार करण्यात आला.


विशेष म्हणजे प्रियांश पवार या विद्यार्थ्याची IISER इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्यूकेशन अँड रिसर्च मध्ये ऐतिहासिक निवड झाल्याने संस्थेच्या इतिहासात अजून एक मानाचा शिरपेच रोवला गेला.
याप्रसंगी संस्थाध्यक्ष डॉ. एस पी बोरोले यांनी सर्व गुणवंतांचे भरभरून कौतुक केले आणि या यशात आई बाबांच्या सर्वोच्च प्रतिसादाबद्दल अभिनंदन केले. डिजिटल टेक्नॉलॉजी चा वापर करून वैद्यकीय क्षेत्रातील विविध करिअरचे मार्ग शोधून यशस्वी करिअर सेट करा असा सल्ला दिला. गुणवंतांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक , मुख्याध्यापक यांचे अभिनंदन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे सर्व संचालक , पंकज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर आर अत्तरदे , पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील , मुख्याध्यापक व्ही आर पाटील, प्राचार्य मिलिंद पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी , दिवाकर बाविस्कर ,नंदलाल वाघ , वैशाली चौधरी, अजय सैंदाने , जितेंद्र महाजन, योगराज रायसिंग, सौरभ कुलकर्णी , संजय भादले, अश्विनी पाटील , इब्राहिम तडवी , विजय पाटील, वेलसिंग बारेला, गौरव पाटील , कैलास बोरसे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिवाकर बाविस्कर यांनी केले तर आभार इब्राहिम तडवी यांनी मानले.













