सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता बालाजी दहिफळे यांच्या मौखिक आदेशाने पेट्रोल पंपाजवळील डेरेदार वृक्षाची कत्तल करून परस्पर विक्री ?..#लाखो रुपयांचा मुद्देमाल गहाळ.. चौकशी मात्र शून्य..

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता बालाजी दहिफळे यांच्या मौखिक आदेशाने पेट्रोल पंपाजवळील डेरेदार वृक्षाची कत्तल करून परस्पर विक्री ?..#लाखो रुपयांचा मुद्देमाल गहाळ.. चौकशी मात्र शून्य..



चोपडा महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क
चोपडा – यावल रस्त्यावरील पेट्रोल पंपा जवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या रस्त्यालगत डेरेदार झाड डौलाने उभे होते. त्या झाडाच्या आडोशाने पेट्रोल पंप दिसत नाही असे सिद्धार्थ नारायण शिरसाट ( सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी ) यांनी पत्रकारांना सांगितले. सदर डेरेदार वृक्षामुळे पेट्रोल पंप दिसत नसल्यामुळे सदर झाड काढण्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारणा केली होती व त्या संदर्भात संबंधित विभागाने त्यांना तोंडी आदेश दिल्याच्या खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कर्मचारी सिद्धार्थ शिरसाट यांनी केला आहे व सदर झाड परस्पर जमीनदोस्त करून सदर झाडाचा मुद्देमाल दिवसाढवळ्या वाहतूक करून गहाळ करण्यात आला आहे .सदर मुद्देमाल हा लाखो रुपयांचा असून देखील सार्वजनिक विभाग मात्र या घडलेल्या घटनेवर बोलायला तयार नाही व कारवाई करायला सुद्धा तयार नाही या मागील गौडबंगाल काय ? असा प्रश्न जनमानसात चर्चिला जात आहे.


चोपडा – यावल रस्त्यावरील काबरा पेट्रोल पंपा जवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या वृक्षाची दिवसाढवळ्या कत्तल करून, मुद्देमाल गहाळ करण्यात आला आहे.व्हायरल झालेल्या फोटो व व्हिडिओमध्ये वाहन व नेणारे व्यक्ती दिसत असून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता बालाजी दहिफळे कारवाई करण्यात का कुचराई करीत आहेत हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे. जर अधिकारीच कारवाई करायला धजावत नसतील तर या मागील नेमके गौडबंगाल काय ? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे जर दिवसाढवळ्या झाडांचे कत्तल करणाऱ्या दोषींवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर अशा प्रकारची चोरी करून कत्तल करणाऱ्या चोरांची मुजोरी दिवसेंदिवस वाढेल यात तीळ मात्र शंका नाही.
घडलेल्या प्रकाराबाबत वृक्ष प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More