भ्रष्टाचाराविरुद्ध चोपडा तालुक्याचा एल्गार.. जनसंघर्ष मोर्चाचे गठन… अमृतराज सचदेव

भ्रष्टाचाराविरुद्ध चोपडा तालुक्याचा एल्गार.. जनसंघर्ष मोर्चाचे गठन… अमृतराज सचदेव


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क


चोपडा तालुक्यासह शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकाच्या माध्यमातून रस्त्यांचे खड्डे बुजविणे,भराव करणे याबाबत कोट्यवधी रुपयांची बोगस कामे होत आहेत.लाखांच्या कामांची बिले कोट्यवधीत काढली जात आहेत. जनतेच्या पैश्यांवर ठेकेदार ,राजकारणी,अधिकारी पोट भरून भ्रष्ट्राचार करत आहेत.याला कुठेतरी आळा घालावा ,अधिकारी व ठेकेदारांची मुजोरीला वचक बसावा,जनतेचा पैश्यांचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी पक्ष विरहित जनसंघर्ष मोर्चाचे गठन करण्यात येत असून यात जास्तीत जास्त नागरिकांनी सामील व्हावे असे आवाहन अमृतराज सचदेव व माजी नगरसेवक डॉ रवींद्र पाटील यांनी केले आहे.


या संदर्भात ऍण्टी करप्शन विभाग महाराष्ट्र त्यांची व व्हिजिलन्स डिपार्टमेंट महाराष्ट्र यांची सुध्दा मदत घेणार असल्याचे अमृतराव सचदेव व माजी नगरसेवक डॉ. रवींद्र पाटील यांनी सांगितले आहे.गेल्या पाच वर्षाच्या काळात तालुक्यासह शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली जात आहेत.विकास कामे केले जात असल्याचा मोठा दावा केला जात आहे मात्र कोट्यवधी रुपयांच्या कामांचे आयुष्य मात्र काही महिन्यांचे ठरत आहे.कामे निकृष्ट दर्जाचे होत असून ठेकेदार,अधिकारी ,राजकारणी यांच्या मात्र तुंबड्या भरत असल्याची माहिती जन संघर्ष मोर्चाच्या प्रमुखांनी दिली आहे.

जनतेच्या पैश्यांवर हे सर्वच जण मजा मारत असून तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग व नागरपालिकेच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार फोफावत आहे.लाखोंचे बिले कोटीत काढले जात आहेत.याला कुठेतरी आळा बसावा,कामांचा दर्जा सुधारून सर्वांवर वचक बसावा या उद्देशाने भ्रष्टाचार हाणून पाडण्यासाठी
जनसंघर्ष मोर्चा गठीत करीत असून मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन अमृतराज सचदेव,माजी नगरसेवक डॉ रवींद्र पाटील यांनी केले आहे.

https://chat.whatsapp.com/IKG85jAq7vK1gSK0JvNfhq या लिंक वर द्वारे जनसंघर्ष मोर्चा मधे सामील होण्याचे आव्हान अमृतराज सचदेव यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More