भारतीय नौदलात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली एकाची साडे सहा लाखांत फसवणूक !

भारतीय नौदलात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली एकाची साडे सहा लाखांत फसवणूक !


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी):-


चोपडा तालुक्यातील अडावद येथील एका शेतकऱ्याच्या मुलाला नोकरीचे आमिष देत ६ लाख ५० हजार रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सविस्तर वृत्त असे की, अडावद येथील शेतकरी विलास विश्वास पाटील ( वय ४५) यांच्या मुलास भारतीय नौदलात नोकरी लावून देण्यासाठी मुंबईतील कांदिवली येथील पुष्पा रवींद्र साळवी व हेमंत रघुनाथ धाळवे यांच्यासह दोन अल्पवयीन संशयित आरोपींनी आमिष दाखवले. त्यानंतर विलास पाटील यांच्या मुलास नोकरी लावून देण्याचे आमिष देत त्यांचाकडून वेळोवेळी ६ लाख ५० हजार रूपये घेत त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अडावद पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More