चंद्रकांत बडगुजर नेट परीक्षा उत्तीर्ण….

चंद्रकांत बडगुजर नेट परीक्षा उत्तीर्ण….


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


प्राध्यापक (प्रोफेसर) पदासाठी पात्रता ठरविणाऱ्या यूजीसी नेट परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर झाला असून या नेट परीक्षेत चंद्रकांत शांताराम बडगुजर यांनी इंग्रजी विषयातून घवघवीत यश संपादन केले आहे.

कला शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथुन इंग्रजी विषयातून एम.ए आणि चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय चोपडा येथून बी.एड पूर्ण केल्यानंतर मागील पाच वर्षांपासून ते नेट परीक्षेची तयारी करत होते. स्वतःची शेती नसल्याने यांचे आई आणि वडील दुसऱ्याच्या शेतात हात मजुरी करतात. योग्य पुस्तकांचा अभाव, अतिशय हलाखीची परिस्थिती, अत्यल्प शैक्षणिक साहित्य यातून योग्य वेळी योग्य मार्ग काढत राहून त्यांनी हे यश संपादन केले आहे. मोठ मोठी पुस्तके विकत घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागत होती. यासाठी त्यांनी वेळप्रसंगी रेशन दुकानावर देखिल काम केले, दिवसभर काम करून रात्री जो वेळ मिळत होता तो पूर्ण वेळ ते अभ्यासासाठी वापरत असत. नेट परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुले मोठ-मोठी कोचिंग क्लासेस जॉईन करतात; कुणी हैदराबादला जातात तर कोणी दिल्लीला जातात मात्र बडगुजर सरांनी घरीच राहून रात्री उशिरापर्यंत जागरण करून संपूर्ण अभ्यास पूर्ण केला. अश्या खडतर प्रवासातून एवढे मोठे यश संपादन केले म्हणून त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुक होत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More