जळगाव जिल्हातील पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर …

जळगाव जिल्हातील पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर …


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


जिल्ह्यातील पंचायत समित्यांची पुढील काही महिन्यांमध्ये निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने आज पं.स. सभापतीपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यात पारोळा : अनुसुचित जाती महिला,भुसावळ आणि बोदवड : अनुसुचीत जमाती,चोपडा : अनुसुचित जमाती महिला जळगाव आणि एरंडोल : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, धरणगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग रावेर, भडगाव,

मुक्ताईनगर आणि चाळीसगाव सर्वसाधारण महिला, अमळनेर, जामनेर, पाचोरा आणि यावल : सर्वसाधारण प्रवर्ग असे आरक्षण निघाले आहे.
अनुसूचित जाती महिला – १; अनुसुचीत जमाती-२ व अनुसुचीत जमाती महिला – १; नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग (विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसह) – १ ; नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग महिला (विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसह) -२ अशा प्रकारे सात पंचायत समिती सभापतीपदे राखीव आहेत. उर्वरित पदांपैकी सर्वसाधारण प्रवर्ग-४ आणि सर्वसाधारण प्रवर्ग महिला – ४ असे आरक्षण निघाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More