पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल येथे आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..

पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल येथे आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल येथे झालेल्या शालेय तालुकास्तर १४ ,१७ आणि १९ वर्षाआतील मुलां मुलींच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेसाठी चोपडा तालुक्यातील १५ संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी संस्थेचे संचालक पंकज बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, तालुका समनव्यक आर. पी. आल्हाट , पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचे प्राचार्य मिलिंद पाटील तसेच क्रीडा विभाग प्रमुख के. पी.पाटील व सर्व क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते.

या स्पर्धेत १४ वर्ष वयोगट मध्ये पंकज ग्लोबल पब्लिक स्कुल तर १७ आणि १९ वयोगटात पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांनी प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
स्पर्धेच्या आयोजनासाठी शाळेचे शिक्षक रणजीत सर, विनोद शिंपी , वैशाली सपकाळे, मालसिंग वळवी व खेळाडू वर्ग यांचे सहकार्य लाभले तर पंच म्हणून मनोज जाधव, ललित सोनवणे ,विजय पाटील व अरविंद जाधव यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धनश्री सनेर ह्या विद्यार्थीनीने केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More