गावठी दारू अड्डयांवर धाडी; २५००लिटर दारू जप्त; १५ जणांवर कारवाई..

गावठी दारू अड्डयांवर धाडी; २५००
लिटर दारू जप्त; १५ जणांवर कारवाई…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा । प्रतिनिधी-


चोपडा उपविभागीय सहा.पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले व पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चहार्डी, अकुलखेडा, चुंचाळे, मामलदे, वेले, विरवाडे, हिंगोणा, आडगाव, चोपडा शहर, रुखनखेडे प्र.चो. आदी गावात शहर पोलिसांच्या पथकाने अवैध हातभट्टी गावठी दारू अड्डयांवर धाडी टाकून ५० हजार रुपयांची ७१० लिटर हातभट्टीची गावठी दारू, १७ देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात येऊन २०० लिटर गावठी दारू बनविण्याचे कच्चे रसायन नष्ट करून पंधरा हातभट्टी गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.

पोलिसांच्या कारवाईने गावठी दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. चोपडा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अजित साळवे ,पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोहेकॉ. सुनील पाटील, पोहेकॉ जितेंद्र सोनवणे, पोना. मधुकर पवार, पोना. संतोष पारधी, पोना. ज्ञानेश्वर जवागे, पोना. दीपक विसावे, पोना. प्रदीप राजपूत, संदीप भोई, पोना. शेषराव तोरे, पोना. सुभाष सपकाळ, पोना. किरण गाडीलोहार, पोकॉ. प्रमोद पवार, पोकॉ. रवींद्र पाटील, पोकॉ. प्रकाश मथुरे, पोकॉ. मनोहर पवार आदी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने शहरासह ग्रामीण भागातील हातभट्टीच्या गावठी दारू अड्डयांवर धाडी टाकण्याची धडक कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More