सराईत हद्दपार गुन्हेगार वैभव उर्फ टकल्या गवळीने व्यावसायीकास मारहाण करत केली खंडणीची मागणी…

सराईत हद्दपार गुन्हेगार वैभव उर्फ टकल्या गवळीने व्यावसायीकास मारहाण करत केली खंडणीची मागणी…


महाराष्ट्र9 न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-


चोपडा शहरातील बारी वाडा भागातील सराईत गुन्हेगार वैभव उर्फ टकल्या गवळी यास मा. उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर भाग यांचेकडील आदेश क्रं. आर.टी.एस./ हद्दपार/२/२०२२/ई. क्यू. जे. ०००५१ दि.१५ नोव्हे.२०२२ अन्वये चोपडा तालुक्यातून व इतर तालुक्यातून हद्दपार केले होते.तरी देखील त्याने मा. उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर भाग यांचे आदेशाचे उल्लंघन करुन चोपडा शहरात प्रवेश करून आपली दहशत सुरूच ठेवली आहे.


दि.१२ जाने. रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास चोपड़ा शहरात माहवीर नगर भागात साईबाबा मंदिराजवळ फिर्यादी गोवर्धन चैत्राम चौधरी व साक्षीदार लक्ष्मण माधव बारी असे साईबाबा मंदिरावर फुलहार ठेवून पंकज स्टॉपकडे जाण्यासाठी निघाले असता सदर ठिकाणी आरोपी वैभव उर्फ टकल्या गोपाल गवळी रा. बारीवाडा चोपडा हा अचानक समोर येवून त्याने गोवर्धन चौधरीचा रस्ता अडविला. गोवर्धन चौधरी हे चोपडा शहरात जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय करित असल्याने त्यांचा व्यवसायातून आरोपी वैभव उर्फ टकल्या गवळीने गोवर्धन चौधरी यांचेकडे खंडणी स्वरुपात १०००० रु ची मागणी केली. गोवर्धन चौधरी यांनी आरोपी टकल्या गवळी यास १०,००० रू खंडणी देण्यास नकार दिल्याचा टकल्या गवळी यास राग आल्याने त्याने त्याच्या हातातील लाकडी काठीने फिर्यादीच्या डाव्या हातावर तसेच डाव्या पायावर मारुन फिर्यादीचा हात फ्रैक्चर केले.सदरचे भांडण साक्षीदार लक्ष्मण बारी हे सोडवण्यासाठी आले असता या दोघांना यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली.


आरोपी वैभव उर्फ टकल्या गवळी यास मा. उपविभागीय दंडाधिकारी सो अमळनेर भाग यांचेकडील आदेश क्रं. आर.टी.एस./ हद्दपार/२/२०२२/ई. क्यू. जे. ०००५१ दि. १५ नोव्हें.२०२२ अन्वये चोपडा तालुक्यातून व इतर तालुक्यातून हद्दपार केले असतांना देखील त्याने मा. उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर भाग यांचे आदेशाचे उल्लंघन करुन नमुद गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने चोपड़ा शहरात फिरतांना मिळून आला म्हणून त्याच्या विरोधात चोपडा शहर पोलिस ठाण्यात सी सी टी एन एस भाग ५ गु र न १५ / २०२३ भा द वि कलम ३८५ , ३२५ , ३४१ , ५०६ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदर गुन्ह्याची माहीती वरिष्ठांना ई-मेल द्वारे कळविण्यात आले असून सदर गुन्ह्याची प्रथम खबरी रिपोर्ट मा.जे.एम.एफ.सी. कोर्ट चोपडा यांचेकडेस पाठविण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अजित सावळे हे करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चोपड्यात वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या 11 जणांवर पिटा कलम अंतर्गत गुन्हे दाखल 2 महिला आरोपी ताब्यात तर 9 जण फरार # गुन्हेगारी रोखण्या करता अनधिकृत वेश्या वस्ती भुईसपाट केली चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले.

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश # बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

Read More