नासिक येथील आयुक्त यांना आदिवासी मुला-मुलीच्या विविध मागण्यांचे निवेदन

चोपडा प्रतिनिधी -नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्तालय कार्यालय नाशिक येथे शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृह जळगाव जिल्हासह चोपडा सह विविध तालुक्यातील विद्यार्थी-विद्यार्थीनीनीचे पात्र प्रवेश व इतर समस्या संदर्भात बाबत आदिवासी विकास आयुक्तालय कार्यालयाचे आयुक्त सरोदे व सहाय्यक अप्पर आयुक्त पाटील सर यांना निवेदन देण्यात आले.


समस्या:-
शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृह जळगाव जिल्हासह चोपडा तालुक्यातील पात्र उर्वरित विद्यार्थी व विद्यार्थीनीना त्वरित वसतिगृहात प्रवेश देण्यात यावी,शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृह चोपडा येथील विद्यार्थी व विद्यार्थीनींना वसतिगृहासाठी शासकीय जागेसह शासकीय इमारत त्वरित बांधण्यात यावी,विष्णापूर,कृष्णापूर ता.चोपडा जि.जळगाव येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेसाठी शासकीय जागेसह शासकीय इमारत त्वरित बांधण्यात यावी,शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृह चोपडा येथील बाकी असलेले डी.बी.टी,निर्वाह भत्ता रक्कम त्वरित देण्यात यावी,गॅप असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनीना संयम योजनेत फार्म भरून त्वरित वेबसाईट चालू त्वरित प्रवेश देण्यात यावी, मागच्या वर्षाची बाकी असलेले डी.बी.टी,निर्वाह भत्ता रक्कम विद्यार्थी व विद्यार्थीनीना त्वरित देण्यात यावी,सन २०१८-१९या वर्षाची शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रताप शिक्षणशास्त्र महाविद्यालय चोपडा,बीएड व एम.जी कॉलेज चोपडा येथील विद्यार्थ्यांना त्वरित देण्यात यावी,अपघाती मृत्यूमुखी पडलेला स्व.कुवरसिंग सायमल पावरा शासकीय आदिवासी मुलांचे जुने वसतिगृह चोपडा या विद्यार्थीची डी.बी.टी,निर्वाह भत्ता, शैक्षणिक सहलीची रक्कम त्वरित देण्यात यावी,
शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृह जळगाव जिल्हा चोपडा तालुक्यासह विविध तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थीनीनीसाठी एमेच सीईटी,टायपिंग, टॉली प्रशिक्षण देण्यात यावे,
शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृह व शासकीय आदिवासी आश्रम शाळा जळगाव जिल्हासह चोपडा तालुकासह विविध तालुक्यात वसतिगृहामध्ये पिण्यासाठीवॉटर कूलर, सौर ऊर्जा बसविण्यात यावे,शासनाच्या जीआर नुसार शासकीय आदिवासी आश्रम शाळेत व शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृहात सोय सुविधा पुरविण्यात यावे,शासकीय आदिवासी आश्रम शाळेत व शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृहात आरोग्य सेवा नियमित पणे पुरविण्यात यावी,जळगाव येथे बीपीएड प्रवेश घेतलेला विद्यार्थी महादू पुनाजी पाडवी या विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरलेला आहे तरी फक्त कागदपत्रे स्कॅनिंग करायचे बाकी आहे तरी त्यांचे कागदपत्रे स्कॅनिंग करून त्यांना त्वरित वस्तीगृहात प्रवेश देण्यात यावी,शासकीय आदिवासी आश्रम शाळा देवझिरी तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील अध्यक्ष गढे सरांची बदली त्वरित करण्यात यावी ,शासकीय आदिवासी आश्रम शाळा व शासकीय आदिवासी वस्तीगृह येथील वैद्यकीय वैद्यकीय सेवा पुरवण्यात यावी ,इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्वयम् योजनेत वेबसाइट चालू करून त्यांना त्वरित प्रवेश देण्यात यावे.निवेदन देतांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे तथा आधारस्तंभ लकिभाऊ जाधव महाराष्ट्र युवा संपर्क प्रमुख दौलत भाऊ मैमाणे छत्रपती संभाजी प्रतिष्ठान इगतपुरी अध्यक्ष धनाजी राव, अमोल राव, माणिक मोगल, संतोष धोंगडे,महिंद्रा डहाळे वकील नाशिक सत्र न्यायालय जळगाव जिल्हा अध्यक्ष दारासिंग पावरा, आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More