श्रींचे विसर्जनासाठी पोलीस प्रशाससन सज्ज मिरवणुकीत ड्रोन व सी सी टीव्ही कॅमेऱ्यांची राहणार नजर….

श्रींचे विसर्जनासाठी पोलीस प्रशाससन सज्ज मिरवणुकीत ड्रोन व सी सी टीव्ही कॅमेऱ्यांची राहणार नजर

चोपहा शहरातील पाच दिवसात होणाऱ्या श्रींचे विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असुन या बंदोबस्तासाठी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगावं विभागसह तीन उपविभागीय पोलीस अधिकारी,पाच पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक / पीएसआय २४, पोलीस कॉनस्टेबल २८४, महिला पोलीस २०, आरसीएफ ३६,स्ट्रायकिंग ४०, सी आर पी एफ ४० एम पी ए ६, व्हिडीओ ग्राफर १० व होमगार्ड १७०असे जवळपास ५००पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत तसेच श्रींचे मिरवणुकीच्या मार्गावर ६० सी सी टीव्ही कॅमेरा सह ड्रोन ची नजर असणार आहे तरी सर्व गणेश भक्तांनी नियमाचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी केले आहे

तसेच श्रींच्या मिरवणुकीत नियमांचे पालन करणाऱ्यागणेश मंडळावर विविध समिती गठीत करण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून तीन गणेश मंडळांची निवड करण्यात येणार आहे त्या मंडळांना जिल्हा स्तरावरून पोलीस प्रशासनातर्फे बक्षीश दिले जाणार आहे असे यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेतकर यांनी सांगितले तसेच गणेश मंडळांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More