चोपडा शहरात दिवसाढवळ्या चोरी: सोन्याच्या दुकानातून ८ तोळे दागिने लंपास # घटना सी सी टीव्ही त कैद…

महाराष्ट्र9न्युज नेटवर्क ​चोपडा:

चोपडा शहरातील मुख्य बाजारपेठेतील ‘गोल्ड हाऊस’ या नामांकित सोन्या-चांदीच्या दुकानात तीन अज्ञात चोरट्यांनी हातचलाखी करून ८ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, भरवस्तीत झालेल्या या चोरीने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

​नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तीन अज्ञात युवक ग्राहक बनून ‘गोल्ड हाऊस’ दुकानात शिरले. सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचे असल्याचे सांगून त्यांनी दुकान कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतले. दागिने पाहत असताना कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून, अत्यंत चलाखीने 81 ग्राम वजनाचा पिशवी वर या चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. हे तिघेही चोरटे कोणाच्याही लक्षात न येता दुकानातून पसार झाले.

​मालकांच्या लक्षात येताच पोलिसांत धाव

दुकान बंद करण्याची वेळ झाल्यानंतर मालक महावीर जैन यांनी दिवसाचा हिशोब आणि सोन्याचा स्टॉक तपासला. यावेळी त्यांना स्टॉकमध्ये तफावत आढळून आली. बारकाईने तपासणी केली असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्वरित त्यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

​पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. तक्रारीवरून पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. शहराच्या मुख्य मार्गावर भरदिवसा झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले असून, चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More