दाहीवद फाट्याजवळ भीषण अपघात चोपड्याचे तीन तरुण जागीच ठार# चार जण जखमी
अमळनेर हून चोपडा कडे येत असलेल्या मोटारसायकल ची समोरून येणाऱ्या ओम्नीला धडक चोपड्यातील तीन युवकांचा जागीच मृत्यू .


अमळनेर हून केटरर्स चे काम करून रात्री ८ वजेच्या सुमारास चोपड्या कडे येत असलेल्या मोटार सायकलला चोपडा हून अमळनेर कडे जाणाऱ्या एम.एच.१९ वाय.१८२८ ओम्नी ची समोर समोर धडक झाल्याने भीषण अपघातात चोपडा येथील सुंदरगढी येथील शुभम पारधी, विजय पारधी,सोनू पाटील तिघे मयत झाले आहेत तरलोहिया नगर मधील पीयूष दीपक मिस्तरी (साई)जखमी झाला असून त्याला उपचारासाठी चोपडा येथील मोरेश्वर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे त्या सोबत चार जण जखमी आहेत.


ज्ञानेश्वर सोनार रा सुरत याला डॉ सुमित सुर्यवंशी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे. एकाला धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे त्यात काही जखमिंची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे तर इतर जखमींना खाजगी दवाखान्यात घेऊन गेले आहेत. मायताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे














