मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहर प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपन्न झाले. 200पेक्षा अधिक रुग्णानी घेतला लाभ आरोग्य शिबिर सौ संध्या नरेश महाजन व नरेश महाजन यांचा लोकहितपयोगी उपक्रम…

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष भाऊ महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सौ संध्या महाजन नगरसेविका प्रभाग क्रमांक १३ चोपडा नगरपरिषद तथा भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष व श्री नरेश महाजन यांच्या सहयोगाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे आरोग्य शिबिर प्रभाग क्रमांक 13 मल्हारपुरा कन्या शाळा क्रमांक दोन येथे दि. 16 एप्रिल रोजी पार पडले.

शहरातील सुमारे 200 ते 225 महिला व पुरुष या नागरिकांनी सदर आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. डॉ. नानासो.डि.ओ. पाटील. डॉ अशोक कदम. डॉ सागर पाटील आणि डॉ गौरव नेवे यांनी आरोग्य नागरिकांची आरोग्य तपासणी केली. पैकी काही नागरिकांना योग्य निदानासाठी पुढील चाचण्या तपासण्या करण्याचे सुचविले, तसेच पात्र लाभार्थी अशा नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजना या अंतर्गत उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या आरोग्य शिबिर यात उपस्थित नागरिकांचे डायबीेटीस, फुफुसांचे आजार, तसेच इतर आजार जसे पोटाचे विकार, लिव्हर सोरायसिस, कावीळ, अस्थिरोग या रोग व विकारांच्या दृष्टीने देखील तपासणी करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More