साकळी येथील आयडीबीआय बँकेचे कर्मचारी यांचा प्रामाणिकपणा
दिड लाखांचे सोने केले परत ग्राहक…

साकळी येथील आयडीबीआय बँकेचे कर्मचारी यांचा प्रामाणिकपणा
दिड लाखांचे सोने केले परत ग्राहक…


महाराष्ट्र 9न्यूज नेटवर्क आजच्या युगात देखील माणुसकी व प्रामाणिकपणा आहे याचे उत्तम उदाहरण जळगाव येथील तरुण साकळी आय डी बी आय बँकेचे कर्मचारी राहूल ठाकूर यांना चुंचाळे येथिल बँकेचे ग्राहक साहेबराव रामदास पाटील हे वयोवृद्ध व्यक्ती बँकेत गोल्ड लोन साठी गेले होते मात्र बँकेत गर्दी खुप असल्याने व वयोमानानुसार ते गोल्ड लोन साठी आणलेले सोने ते राहूल ठाकूर यांच्या टेबलावर विसरून घरी निघून आले ही बाब दोन तासानंतर गोल्ड लोन कर्मचारी राहूल ठाकूर यांच्या लक्षात येताच त्यांनी कोणतेही विलंब न करता त्यांना स्वताहून फोन करून याबाबतची माहिती सांगितली व ते सोन्याचे दागिने सिल करून आपल्या कपाटात ठेवले असुन, आपले सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचे माहीती मिळताच त्यांनी गोल्ड लोन कर्मचारी राहूल ठाकूर यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचे आभार मानले त्यांच्या या प्रामाणिकपणाचे साकळीसह परीसरात कौतुक होत आहे.


त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक शाखाधिकारी सतीश पाटील, बँक कर्मचारी अनिल बानाईत,चुंचाळे पोलीस पाटील गणेश पाटील, वसंत महाजन,शारदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कार्य अध्यक्ष सुभाष महाजन, यावल खरेदी विक्री संघाचे संचालक सुनिल नेवे चुंचाळे,माजी ग्रा.प.सदस्य दिपक नागो पाटील, डॉ सुनिल पाटील साकळी, प्रगतीशिल शेतकरी विलास पाटील, पत्रकार चंद्रकांत नेवे,शिरसाड ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील, योगेश साहेबराव पाटील यांच्या सह परिसरातील बँकेचे ग्राहक यांनी त्यांचें कौतुक केले..



प्रतिक्रिया….
आमच्या बँकेच्या ग्राहकाचे बँकेत राहिलेले सोने मी प्रामाणिकपणे परत केलेले असून माझ्या या कृतीने बँक व ग्राहक यांचे नाते अधिकच दृढ होण्यास मदत निश्चितच मदत होणार आहे.माझ्या आई-वडिलांच्या संस्कारातूनच माझ्या अंगी प्रामाणिकपणा हा गुण मिळालेला असून या गुणामुळेच माझ्या हातून हे चांगले सत्कर्म घडले आहे याचा मला मनस्वी आनंद आहे.
श्री.राहुल ठाकूर(लोन ऑफिसर)
आयडीबीआय बँक,साकळी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

४ ऑक्टोबरच्या जळगाव येथील ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी चोपड्यात बैठक ​अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात सर्व ५९ जाती एकवटल्या; डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात बैठक संपन्न

चोपडा येथे तापी सहकारी सूतगिरणीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ​तापी सूतगिरणीला ५८ लाखांचा नफा; शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेपर्यंत गप्प बसणार नाही – चेअरमन कैलासबापू पाटील यांचे प्रतिपादन

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा : गट क्रमांक ११०१ मधील अनधिकृत संकुलातील दुकानांचे क्षेत्रफळ कमी करण्याचे काम सुरू # विनायक पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाल्याचा दावा; अनधिकृत बांधकाम, नगररचना मान्यता व वीज जोडणीबाबत उपस्थित झाले प्रश्न?

चोपडा उपनगराध्यक्षांचा मनमानी कारभार उघड; तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाला आली जाग!#गट क्र. ११०१ मधील १६ अनधिकृत दुकानांचा प्रस्ताव तक्रारीनंतर दाखल | धोकादायक DP हटवण्याची विनायक पाटील यांची मागणी

Read More